Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्र दिनापासून ‘एक राज्य, एक नोंदणी’: चंद्रशेखर बावनकुळे; व्यवहार सोपे, पारदर्शक हाेणार
Mumbai News : आधार कार्ड आणि उत्पन्नाच्या दाखल्यावरून तुमचा चेहरा नोंदणीसाठी वापरण्याची सुविधा मिळणार आहे. नागरिकांचा वेळ वाचेल आणि डिजिटल प्रक्रियेमुळे महसूल व्यवहार अधिक पारदर्शक होतील.
मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. १ मेपासून ‘फेसलेस नोंदणी’, ‘मुद्रांक नोंदणी’ आणि ‘एक राज्य, एक नोंदणी’ प्रणाली सुरू करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.