कर्जबाजारीपणाच्या नैराश्‍यातून एकाची आत्महत्या 

कर्जबाजारीपणाच्या नैराश्‍यातून एकाची आत्महत्या 

नवी मुंबई -  कर्जबाजारीपणाच्या नैराश्‍यातून एका 42 वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. जसबिरसिंग लालिया (42) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून कर्जबाजारीपणामुळे आपले आयुष्य संपवत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. 

जसबिरसिंग हे साईसंग इमारतीत आपल्या कुटुंबासह होते. वर्षभरापूर्वी त्यांनी आपले राहते घर तारण ठेवत एका खासगी बॅंकेतून तब्बल 44 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सुरुवातीला कर्जाचे काही हप्ते त्यांनी सुरळीत भरले. मात्र नंतर त्यांना कर्ज फेडणे शक्‍य होत नव्हते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते. आपली पत्नी आणि मुले पंजाब येथील मूळगावी गेले असता जसबिरसिंग यांनी शुक्रवारी (ता. 9) गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी जसबिरसिंग यांच्या आईने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र जसबिरसिंग फोन उचलत नसल्याने त्यांचे घर गाठले असता, त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना जसबिरसिंग याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी हाती लागली. त्यातून कर्जबाजारीपणाच्या नैराश्‍यातून त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com