esakal | मुंबईत कोरोनाचे 1,372 नवे रुग्ण, शुक्रवारी 90 कोरोनाबाधितांचा मृत्यू...
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोनाचे 1,372 नवे रुग्ण, शुक्रवारी 90 कोरोनाबाधितांचा मृत्यू...

मुंबईमध्ये शुक्रवारी 1,372 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या 55 हजार 357 वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे 90 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 2042 वर पोहचला आहे. 

मुंबईत कोरोनाचे 1,372 नवे रुग्ण, शुक्रवारी 90 कोरोनाबाधितांचा मृत्यू...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी 1,372 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या 55 हजार 357 वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे 90 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 2042 वर पोहचला आहे. 

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून, शुक्रवारी मुंबईमध्ये 90 जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये 65 जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये 65 पुरुष तर 25 महिलांचा समावेश आहे. त्यामूळे मुंबईतील रुग्णांची संख्या 55 हजार 357 एवढी झाली आहे. 

मृतांमधील 6 जणांचे वय 40 वर्षांखाली आहे. 46 जण हे 60 वर्षांवरील, तर 38 जण हे 40 ते 60 वर्षादरम्यान होते.  मुंबईत कोरोनाचे 805 संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या 39 हजार 988 वर पोहचली आहे. तसेच 943 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल 25 हजार 152 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

या महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

15 जूनपासून पुन्हा कडक लॉकडाऊन ? यावर CMO ने केलं ट्विट, मुख्यमंत्री म्हणतात...

इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियाविरोधात जारी होणार रेड कॉर्नरसाठी नोटीस? वाचा काय आहे प्रकरण

कोरोनाची लागण झाल्यांनतर धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात...

स्थलांतरीत कामगारांचे मुंबईत परतण्यासाठी मालकांना साकडे; वाचा बातमी

कोरोना नसतानाही रिपोर्ट दिला पॉझिटिव्ह, वकील मॅडमने खासगी लॅबवर ठोकला 'इतक्या' लाखांचा दावा...

one thousand three hundred seventy three new covid positive patients detected in mumbai 
 

loading image