Mumbai News: 1,000 झाडांवर कुऱ्हाड, वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी वृक्षतोडीला मंजुरी

Coastal Road Project: वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड प्रकल्पासाठी एक हजार झाडे तोडण्यात येणार आहेत. तर या बदल्यात १९ हजार ५७३ नवीन झाडे लावली जाणार आहेत.
Tree Cutting

Tree Cutting

Esakal

Updated on

मुंबई : पश्चिम उपनगरातील फोडण्यासाठी वाहतूक कोंडी महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड प्रकल्पासाठी सुमारे एक हजार झाडे तोडण्यात येणार आहेत. यामध्ये तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात पनवेल आणि रायगड परिसरात १९ हजार ५७३ नवीन झाडे लावण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून, पालिका वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com