esakal | मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अचानक मोठ्या व्यापाऱ्याने घुसवली गाडी
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अचानक मोठ्या व्यापाऱ्याने घुसवली गाडी

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या ताफ्यात (car convoy) काल अचानक एका अज्ञात चालकाने त्याची गाडी घुसवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साकीनाका अत्याचार (sakinaka) प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांची (police officers) बैठक संपवून वर्षा या शासकीय निवासस्थानी जात असताना हा प्रकार घडला.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सुरक्षेसाठी असलेल्या रक्षकांनी त्या अज्ञात वाहन चालकाला ताफ्यातून बाहेर पडण्याचा इशारा केला. हा चालक वेडी-वाकडी गाडी चालवत होता. कानात इअरफोन असल्यामुळे सुरक्षा रक्षकांकडे त्याचे लक्ष नव्हते. अखेर काही अंतरावर वाहतूक पोलिसांनी त्याची गाडी थांबवली.

हेही वाचा: आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण दु:खी - गडकरी

चौकशीत ड्रायव्हर हा मोठा व्यापारी आहे आणि मलबार हिलमधील एका निवासी इमारतीत राहत असल्याचे समजले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला कलम ४१ अ नुसार नोटीस बजावली आहे.

loading image
go to top