महिलेला अश्‍लील गटात ऍड करणारा अटकेत 

महिलेला अश्‍लील गटात ऍड करणारा अटकेत 

मुंबई - मित्रांसोबत "ट्रीपल एक्‍स' हा अश्‍लील ग्रुप बनवून त्यात एका महिलेला चुकून ऍड करणे 24 वर्षीय तरुणाला महागात पडले आहे. याप्रकरणी ग्रुप ऍडमिनला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. 

माटुंगा परिसरात राहणाऱ्या आशा मोरे (44, नाव बदलले आहे.) खासगी कंपनीत कामाला आहेत. 17 सप्टेंबरला व्हॉट्‌सऍप तपासत असताना "ट्रीपल एक्‍स' नावाच्या अनोळखी ग्रुपमध्ये ऍड करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. या ग्रुपमध्ये अश्‍लील चित्रफिती व छायाचित्रे असल्याचे समजल्यावर त्यांनी माटुंगा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. चौकशीत या ग्रुपचा ऍडमीन पश्‍चिम बंगाल येथील असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित मोबाईल क्रमांकाचे ठिकाण तपासले असता ती व्यक्ती मुंबईत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी मुस्ताक अली शेख (24) याला अटक केली. सुतार काम करणाऱ्या शेखला मुंबईत काम मिळाल्याने तो येथे आला होता. चौकशीत चुकून हा क्रमांक ग्रुपमध्ये ऍड केल्याचे त्याने सांगितले आहे. पण पीडित महिलेचा मोबाईल क्रमांक त्याच्याकडे कसा आला याचा तपास सुरू आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com