

Onion Price Hike
ESakal
जुईनगर : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या कांद्याच्या भावाने अखेर पन्नाशी पार केली आहे. एपीएमसी घाऊक बाजारात शुक्रवारी (ता. ४) कांद्याला प्रतिकिलो ५२ ते ५३ रुपयांचा भाव मिळाला. या भाववाढीमुळे बळीराजाला दिलासा मिळाला असला, तरी किरकोळ बाजारात कांदा ६५ ते ७० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.