अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी वेबसाईट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुंबई - अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नव्या वेबसाईटची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहेत. 

प्रवेशप्रक्रियेतील कॉलेजांच्या नोंदणीसाठी ही वेबसाईट खुली झाली. पहिल्या दिवशी कोणतेही विघ्न न आल्याने शिक्षण उपसंचालक विभागातील अधिकारी खुशीत होते. अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत अनेक बदल करण्याची सूचना यंदा मुंबई उच्च न्यायालयाने दिली होती. त्यामुळे खात्याने या वेबसाईटची जबाबदारी नव्या कंपनीकडेच दिली आहे. या प्रक्रियेसाठी कॉलेजांची नोंदणी सक्तीची करताना त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. 

कॉलेजांना देण्यात आलेल्या युजर आयडी आणि पासवर्डद्वारे ही नोंदणी होईल. http://mumbai.11thadmission. net या वेबसाईटवर ही नोंदणी होईल. त्यासाठी कॉलेजांना 13 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 10 ते 15 एप्रिलदरम्यान महाविद्यालयांनी या नोंदणीसाठी आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे सादर करावीत. यासाठी मुलुंड येथील केळकर महाविद्यालयात विशेष शिबिर घेण्यात येत असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागाने दिली. 

युजर आयडी लॉगइनची प्रतीक्षा 
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी 700 हून अधिक महाविद्यालयांची नोंदणी होईल. त्यासाठी महाविद्यालयांना शिक्षण उपसंचालक विभागाकडून युजर आयडी व पासवर्ड पाठवण्यात येणार आहे; पण अद्याप अनेक महाविद्यालयांना हे आयडी व पासवर्ड मिळालेले नाहीत. मात्र, त्यांना शुक्रवारी रात्रीपर्यंत युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक विभागाने सांगितले.

Web Title: online admission college