एटीएम कार्डधारकांची ऑनलाईन फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नवी मुंबई - एटीएम कार्डधारकांशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्याकडून एटीएम कार्ड व ओटीपीची माहिती घेऊन त्यांच्या बॅंक खात्यातून ऑनलाईन पैसे काढून फसवणूक करणारी टोळी नवी मुंबईत सक्रीय आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात या टोळीने बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून आधारकार्ड बॅंक खात्याशी लिंक करण्याची थाप मारून दोन महिलांना हजारोंचा गंडा घातला. एटीएम कार्ड व ओटीपीची माहिती कुणालाही देऊ नये, अशा सूचना वारंवार बॅंक आणि पोलिस देत असतानाही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने हे प्रकार वाढले आहेत. 

सीबीडी सेक्‍टर-4 येथील सुनीता पंड्या या 65 वर्षांच्या वृद्धेला गेल्या फेब्रुवारीत एका व्यक्तीने आयसीआयसीआय बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून त्यांच्या एटीएम कार्ड व ओटीपीचा नंबर घेऊन त्यांच्या बॅंक खात्यातील 32 हजार 720 रुपये परस्पर ऑनलाईन काढून घेतले. त्यानंतर वाशी सेक्‍टर-12 येथील रीना अमीष पटेल (वय 38) या विवाहितेलाही फोनवरून संपर्क साधून त्यांचे बॅंक खाते आधारकार्डशी लिंक न केल्यास एटीएम कार्ड बंद होईल, असे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्डचा नंबर व ओटीपी घेऊन त्यांच्या खात्यातील पैसे परस्पर ऑनलाईन काढून घेतले. 

Web Title: Online fraud of ATM card holders