महिलेला ऑनलाईनद्वारे 40 हजारांचा गंडा

file photo
file photo

मुंबई : वस्तू विकण्याच्या संकेतस्थळावरून वरळीतील एका महिलेला 40 हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
वरळीतील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या एका महिलेला तिच्या घरातील वॉशिंग मशीन, मिक्‍सर, टोस्टर अणि वॉटर फिल्टर या जुन्या वस्तू विकायच्या होत्या. मोबाईलवरील मार्केटिंग ऍपवर तिने या वस्तूंची छायाचित्रे अपलोड केली. त्यानंतर काही दिवसांत अनिल शर्मा नामक व्यक्तीचा तिला कॉल आला. त्याने आपले जुन्या वस्तू विकत घेण्याचे दुकान असल्याचे सांगत महिलेकडून वस्तू खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, या वस्तू विकल्या गेल्याचे ऑनलाईन चिन्हांकीत करण्यास त्याने सांगितले. महिलेने चिन्हांकीत केल्यानंतर शर्मा याने महिलेला गुगल पेद्वारे 20 हजार रुपये पाठवल्याचे सांगितले; मात्र आपण गुगल पे वापरत नसल्याचे सांगताच शर्माने मदत करतो, असे सांगत महिलेला गुगल पेचे खाते सुरू करून देत 10 रुपये पाठवले आणि पाठवलेला बारकोड स्कॅन करण्यास सांगितले. महिलेने बारकोड स्कॅन करताच तिच्या बॅंक खात्यातून दोन वेळा 20 हजार कापले गेले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने तत्काळ वरळी पोलिसांत तक्रार दिली. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com