esakal | दारूची होम डिलेव्हरी सुरु तर झाली, पण 'या' कारणामुळे तळिरामांचा होतोय भ्रमनिरास...
sakal

बोलून बातमी शोधा

दारूची होम डिलेव्हरी सुरु तर झाली, पण 'या' कारणामुळे तळिरामांचा होतोय भ्रमनिरास...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित (कंटेन्मेंट) क्षेत्र वगळून इतर ठिकाणी सीलबंद मद्य विक्री करण्याला परवानगी देण्यात आली होती. त्यात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागातर्फे घरपोच मद्य विक्रीला रविवारपासून परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी ही मद्य विक्री केवळ परवाना धारकांनाच करण्यात येणार आहे.

दारूची होम डिलेव्हरी सुरु तर झाली, पण 'या' कारणामुळे तळिरामांचा होतोय भ्रमनिरास...

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित (कंटेन्मेंट) क्षेत्र वगळून इतर ठिकाणी सीलबंद मद्य विक्री करण्याला परवानगी देण्यात आली होती. त्यात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागातर्फे घरपोच मद्य विक्रीला रविवारपासून परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी ही मद्य विक्री केवळ परवाना धारकांनाच करण्यात येणार आहे.

त्यामुळे तळिरामांचा पुन्हा हिरमोड झाला असून मद्य पिण्याचा परवाना मिळवण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीचे प्रमाण वाढले आहे. यात शुक्रवारी एकाच दिवशी हजार ते बाराशे नागरिकांनी मद्य परवान्यासाठी नोंदणी केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक (ठाणे) नितीन घुले यांनी दिली. 

क्लिक करा : आळस झटका...आता स्थानिकांना खऱ्या अर्थाने रोजगाराची संधी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता सर्वत्र मार्च महिन्याच्या अखेरीपासून टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील अस्थापनां व्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यात मद्याची दुकाने देखील बंद ठेवण्यात आल्याने विक्री ठप्प झाली होती.

यात मद्यापींचा चांगलाच हिरमोड झाला होता. त्यात राज्य सरकारने गेल्या आठवड्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता काही भागात मद्य विक्रीला परवानगी दिली होती. मात्र, ग्राहक लांबच लांब रांगा लावून मद्य खरेदी करत असतानाचे चित्र पहायला मिळाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका होता. 

याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी सीलबंद मद्य विक्री करण्याला परवानगी देण्यात आली आहे. घरपोच मद्य विक्रीला परवानगी देताना विविध उपाययोजनांची आखणी करण्यात आली आहे. घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या तपासणीनंतर डॉक्टरांतर्फे मिळणारे प्रमाणपत्र राज्य उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक कार्यालयांमध्ये जमा करायचे असून, या प्रमाणपत्रानंतरच घरपोच मद्यपुरवठा करण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. तर नागरिकांना घरपोच मद्य मागवता यावे यासाठी मद्य दुकानांच्या बाहेर संपर्क क्रमांक लावण्यात येणार आहे. 

क्लिक करा : मंदीत दलालांनी साधली संधी, स्थलांतरितांकडून बक्कळ वसुली!

दरम्यान, मद्याविक्री घरपोच सुरू झाली असली तरी केवळ मद्यापानाचा परवाना असणाऱ्यांनाच घरपोच मद्य मिळणार आहे. त्यामुळे मद्यपानाचा परवाना नसलेल्या तळिरामांचा यामुळे हिरमोड झाला आहे. यावर तोडगा म्हणून काहींनी मद्यपानाचा ऑनलाईन परवाना काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, शुक्रवारी एकाच दिवशी बाराशे जणांनी परवान्यासाठी नोंदणी केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने देण्यात आली.

लक्ष ठेवण्यासाठी पथके
घरपोच मद्य विक्री करताना कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 13 पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्रात मद्य विक्री होणार नाही, याकडेही ही पथके लक्ष ठेवणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांनी दिली.

loading image
go to top