ऑनलाईन निकाल अन् ऑनलाईन शिक्षण, गरीब विद्यार्थ्यांच्या शाळांसमोर गहन प्रश्न

students
students
Updated on

मुंबई : कोरोनाच्या संशयित रुग्णांचे विलगीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने काही शाळा ताब्यात घेतल्या आहेत. तेथे निकाल जाहीर करून ऑनलाईन पद्धतीने पालकांना कळवावा. त्याचप्रमाणे पुढील वर्षी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे. परंतु, या सूचनेचे पालन कसे करायचे, अशी चिंता दुर्बल घटकातील विद्यार्थी असलेल्या शाळांच्या चालकांना लागली आहे. 

सधन मुलांच्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन निकालाचा प्रश्न येणार नाही. परंतु, गरीब, कामगार आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या श्रमिकांची मुले शिकतात, त्या शाळांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी कठीण असल्याचे संस्थाचालक सांगत आहेत. घाटकोपरच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे शिवाजी टेक्निकल हायस्कूल विलगीकरण केंद्रासाठी 1 एप्रिलपासून प्रशासनाने ताब्यात घेतले. त्याआधीच शाळा बंद झाली होती व दहावी-बारावी वगळता कोणत्याही परीक्षा झाल्या नव्हत्या. वर्षभरातील परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करावा. पुढील शिक्षणही ऑनलाईन पद्धतीने द्यावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. 

या शाळेत ४३ कुटुंबांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांचा निकाल पाहण्यासाठी शाळेत जाणे शक्य नाही. अनेक गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन आणि संगणक नसतात. अनेक पालक संपर्कासाठी कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक देतात. त्यामुळे ऑनलाईन निकाल सर्व पालकांना कळवणे कठीण आहे, असे संस्थेचे कार्याध्यक्ष शरद फाटक यांनी ’सकाळ’सांगितले. गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे कठीण आहे. संगणक, स्मार्टफोन व व्हॉट्सअॅप आदी समाजमाध्यमे असलेल्या विद्यार्थ्यांनाच अभ्यासक्रम पाठवता येईल. इतरांना अभ्यासक्रम देणे अशक्य होईल, असे फाटक म्हणाले. 

निम्म्या-निम्म्या विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळेत बोलावता येईल. शाळांमध्ये सभागृह वा मैदान असल्यास तेथे मुलांना एकमेकांपासून लांब अंतरावर बसवून तीन ते चार तुकड्यांना एकत्र शिकवता येईल. अशा उपायांना सरकारने परवानगी द्यावी.
- शरद फाटक, कार्याध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, घाटकोपर

Online results, education impossible; Deep questions in front of schools for poor children

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com