esakal | पुस्तकांच्या 'ऑनलाईन' विक्रीमुळे 'ऑफलाईन' विक्रेते नाराज; सरकारकडे केली ही मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

पुस्तकांच्या 'ऑनलाईन' विक्रीमुळे 'ऑफलाईन' विक्रेते नाराज; सरकारकडे केली ही मागणी

पुस्तकाची दुकाने बंद आहेत, पण ऑनलाईन विक्रीस परवानगी आहे, त्यामुळे अनेक पुस्तक विक्रेते नाराज झाले आहेत. ऑनलाईन विक्री केल्यास आपल्या उद्योगावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल, अशी भिती त्यांना वाटत आहे. त्याचबरोबर ऑनलाईन विक्री सुरक्षित नसल्याचेही त्यांनी म्हंटले आहे

पुस्तकांच्या 'ऑनलाईन' विक्रीमुळे 'ऑफलाईन' विक्रेते नाराज; सरकारकडे केली ही मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः पुस्तकाची दुकाने बंद आहेत, पण ऑनलाईन विक्रीस परवानगी आहे, त्यामुळे अनेक पुस्तक विक्रेते नाराज झाले आहेत. ऑनलाईन विक्री केल्यास आपल्या उद्योगावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल, अशी भिती त्यांना वाटत आहे. त्याचबरोबर ऑनलाईन विक्री सुरक्षित नसल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

मोठी बातमी! मुंबईची लाइफलाईन टप्प्याटप्प्याने लवकरच सुरू होणार?

देशभरात लॉकडाऊन आहे, त्यामुळे जीवनावश्यक नसलेली अनेक दुकाने बंद आहेत. मात्र ऑनलाईन विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र हा आमच्यावर अन्याय आहे. आम्ही उद्योग बंद ठेवून आमचे नुकसान करीत आहोत, पण सरकार भविष्यातील आमचा बिझनेसच कमी करीत आहे, अशी तक्रार पुस्तक विक्रेते करीत आहेत.
E-कॉमर्सला रेड झोनमध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंचा पुरवठा करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. मात्र थेट विक्रेत्यांनी कसलीच परवानगी नाही. ही दोघातील थेट स्पर्धा होत नाही. आता अंतिम टप्प्यातील डिलिव्हरी व्यक्तींमार्फतच होते. त्यांचा ग्राहकांशी थेट संपर्क येणार. हेच आम्ही दुकानात थेट विक्री केले तरी होणार. आता एकतर थेट विक्रीस परवानगी द्यावी किंवा इ-कॉमर्सद्वारे होणारी विक्री बंद करावी असे आवाहन त्यांनी केली. 

मुंबईकरांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी; जाणून घ्या अधिक माहिती 

ऑनलाईन विक्रीचा प्रश्न केवळ पुस्तक विक्रेत्यांचाच नाही तर अन्य विक्रेत्यांचाही आहे. ऑनलाईन विक्री सुरु केल्यामुळे दुकाने सुरु झाल्यावर त्याकडे कोणी फिरकणार नाही अशी भिती व्यक्त केली जात होते. दोन महिन्यांच्या नुकसानातून कसे सावरणार अशी विचारणा केली जात आहे.

loading image