नऊ हजारांच्या टीव्हीसाठी मोजले दीड लाख!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मुंबई - ई-कॉमर्स संकेतस्थळावरून टीव्ही खरेदी करणे माटुंग्यातील ७२ वर्षांच्या वरिष्ठ नागरिकाला भलतेच महाग पडले. नऊ हजारांच्या टीव्हीसाठी त्यांनी दीड लाख मोजले; पण अखेरीस त्यांना टीव्ही मिळालाच नाही. याप्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. माटुंग्यातील रहिवासी असलेल्या कुरश्रू गोटला यांनी टिव्हीसाठी  संकेतस्थळावर असलेल्या अहमद नावाच्या व्यक्तीला ई-मेल पाठवला. गोटला यांनी साडेचार हजार रूपये भरले. हा टीव्ही परदेशातून येत असल्यामुळे त्यावर विविध करांच्या नावाखाली गोटला यांना त्यांनी सुमारे दीड लाख रुपये भरण्यास भाग पाडले.

Web Title: online TV shopping in the expensive