... नाहीतर कोरा मातीचा गणपती पुजावा लागेल; मुंबईत ही महत्त्वाची परवानगीच अजून मिळालेली नाही  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

... नाहीतर कोरा मातीचा गणपती पुजावा लागेल

गणेशोत्सवाला केवळ 60 दिवस बाकी आहेत; मात्र मुंबईत अजून गणेश मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी मंडप परवानग्या मिळालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मुर्ती कशी घडवणार, असा प्रश्न मुर्तीकारांना पडला आहे.

... नाहीतर कोरा मातीचा गणपती पुजावा लागेल; मुंबईत ही महत्त्वाची परवानगीच अजून मिळालेली नाही 

मुंबई : गणेशोत्सवाला केवळ 60 दिवस बाकी आहेत; मात्र अजून गणेश मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी मंडप परवानग्या मिळालेल्या नाहीत. दोन दिवसांपूर्वी मुंबई पालिकेने राज्य सरकारचे पुढील निर्देश येईपर्यंत मूर्तिकार व मंडळांना मंडप परवानगी देऊ नये, असे निर्देश काढले. त्याबाबत मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सराकरचे निर्देश येणार कधी, तोपर्यंत मूर्तिकारांनी मूर्ती कशा घडवायच्या, राज्य सरकारने निर्देश लवकर न आल्यास भाविकांना यंदा कोरा मातीचा गणपती पूजण्याची वेळ येईल, अशा शब्दांत बृहन्मुंबई मूर्तिकार संघाचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर यांनी नाराजी व्यक्त केली.

कसा साजरा होणार गणेशोत्सव; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

दोन दिवसापूर्वी गणेशोत्सव बाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. परंतु बैठकीमध्ये मूर्तिकारांच्या प्रश्नाबाबत फारसी चर्चा झाली नाही. आता मुंबई पालिकेत्या या नव्या निर्देशामुळे मूर्तिकारांसमोर आणखीच संकट उभे राहिले आहे. ल़ॉकडाऊनमुळे आधीच मूर्तिकारांचे कंबरडे मोडले आहे. तरिही मूर्तीकार कुठेही हतबल न होता निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून मूर्ती घडवण्याचे काम करत आहे. पण आता घरात मूर्ती तयार करणे अशक्य आहे. त्यामध्ये मातीची मूर्ती या पावसाळ्यात कशा जपायच्या हा देखील मोठा पेच. मुंबईत 90 टक्के मूर्तिकार हे पालिकेकडून मिळणाऱ्या मंडपाच्या जागेवर अवलंबून आहे. अनेक मूर्तीकारांची घर 10 बाय 10 जागेत आहेत. अशा परिस्थितीत तो मूर्ती कशा घडवणार, असा प्रश्न गजानन तोंडवळकर यांनी उपस्थित केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी येत्या आठवड्यात गणेशोत्सवाबाबत निर्देश काढून मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी जागा निर्माण करून द्यावी, अशी विनंती तोंडवळकर यांनी केली. 

75 बालकामगार मुंबईत अडकले; तीन महिन्यानंतरही प्रशासन सुस्त 

मंडप परवानगी देताना मुंबई पालिकेने ठराविका अंतर राखण्याची अट मूर्तिकारांना मान्य आहे. या वर्षी नेहमीच्या स्लॉटमध्ये मंडप घालता आले नाही तरी चालेल मूर्तिकारांची स्थलांतराची तयारी आहे. मिळेल त्या जागी शासनाचे सर्व नियम व निर्देशांचे पालन मूर्तिकार मूर्ती घडवतील, अशी हमी मूर्तिकार संघाने दिली आहे. तसेच, या वर्षी पेण - हमरापूर मधून येणाऱ्या मूर्तीबबात बृहन्मुंबई मूर्तिकार संघाने धोरण निश्चित केले आहे. 

यंदा पदपथावर मुर्ती मिळणार नाही
पेण -हमरापूरमधून येणाऱ्या मूर्तीची ऑर्डर मूर्तिकारांनी संघाच्या समन्वयाने द्यायची आहे. पेण-हमरापूरमधून येणाऱ्या गाड्यांचे पूर्ण सॅनिटायझेशन केले जाते. तसेच दरवेळी येणारा वाहन चालक पाच ते सहा दिवसाचे विश्रांती घेतो. जेणेकरुन कोरोना संसर्ग टाळता येईल. दरवर्षी दादर गिरगांव येथे गणेशोत्सवाला आठवडा असताना रेडिमेड गणेश मूर्ती  फूटपाथवर विकण्यासाठी पेण-हमरापूर मधून विक्रेते येतात. ते यावर्षी येणार नाही. ते केवळ मूर्तिकारांच्या माध्यमातून आपल्या मूर्ती पाठवतील. असा करार पेण - हमरापूर मूर्तिकार संघटना व बृहन्मुंबई मूर्तिकार संघामध्ये झाला आहे, अशी माहिती तोंडवळकर यांनी दिली. त्यामुळे या वर्षी पदपथावर आयत्यावेळी गणेश मूर्ती मिळणार नाही. त्यामुळे भाविकांनी आगाऊ जवळच्या मूर्तिकारांकडे मूर्ती बुक करण्याचे आवाहन संघाने केले आहे. 

'या' तारखांची नोंद करून ठेवा, या तारखांना यावेळी येणार समुद्रात हायटाईड


मूर्ती घडवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. आता कोरोनाच्या भीतीमुळे सोसायटीमध्ये जागा मिळत नाही. गणेशोत्सव दिवस कमी आहेत. मूर्ती कशा बनणार त्यातून उत्पन्न कसे मिळणार अशा चिंतेत प्रत्येक मूर्तिकार आहे. या व्यवसायातील 90 टक्के मूर्तिकारांचे पोट वर्षातून येणाऱ्या एका सणावर भागते. मंडळांनी मर्यादित उंची या वर्षी ठेवावी. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येईल. मूर्तिकार मंडळात जाऊन मूर्ती घडवेल पण त्याला काही झाल्यास त्याची जबाबदारी मंडळ स्वीकारणार का, ? 
- श्रेयस वारंगकर, मूर्तिकार

खालापूर येथे खोदकामात सापडली शंकराची पिंड; नागरिकांमध्ये उत्सुकता...

Web Title: Ganesh Sculptors Mumbai Have Not Yet Received Mandap Permits Making Idols

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..