esakal | मुंबईतील शाळा वर्गात २५ विद्यार्थ्यांनाच प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबईतील शाळा वर्गात २५ विद्यार्थ्यांनाच प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग चार ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत; मात्र वर्गात फक्त २५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यापेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास या विद्यार्थ्यांचे एका दिवसाआड वर्ग भरवावेत, असा निर्णय आज पालिकेने घेतला आहे. तसेच शाळेत कोविड नियमावलीचे पालन होत आहे की नाही याची अचानक भेटी देऊन पाहाणी करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

हेही वाचा: Olympic : जिंकलो नसलो तरी पुन्हा जिंकण्यासाठीच खेळणार

महापालिकेच्या सर्व शाळांचे शनिवारपर्यंत (ता.२) निर्जुंतुकीकरण होणार आहे. खासगी शाळांनीही निर्जुंतुकीकरण करून घेणे बंधनकारक आहे. शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्याही स्वच्छ करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीची अट शिथिल करण्यात आली आहे; तर कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी वर्गात फक्त २५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. आवश्‍यकता असल्यास एक दिवसाआड प्रवेश देण्यात येणार आहे.
शाळा सुरू झाल्यावर मुले एकत्र खेळणार नाहीत, डब्बा खाणार नाहीत, याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

महापौरांनी आज पालिका शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालकांशी संवाद साधला.

loading image
go to top