मुंबई पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दिवसाला फक्त 8 नवीन रुग्ण

मुंबई पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दिवसाला फक्त 8 नवीन रुग्ण

मुंबई: शहरातलं पहिलं कोविड- 19 रुग्णालय अशी ओळख असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात आता कोविड- 19 संदर्भात होणारे उपचार आता बंद करण्याची वेळ आली आहे. कस्तुरबा रुग्णालय हे शहरातलं पहिलं रुग्णालय होतं. जिथे टेस्टिंग चाचण्या विलगीकरण आणि उपचार अशा सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या.

या व्हायरसचा सर्वात जास्त प्रभाव असताना त्या रुग्णालयात 80 रुग्ण दररोज भरती व्हायचे. मात्र हा आकडा आता आठ वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे, रुग्णालयाने कोविड -19 च्या बेडची संख्या 275 वरून 125  वर आणली आहे.

या घडीला रुग्णालयात फक्त कोविड -19 चे रुग्ण असून त्यातील एकही रुग्ण आयसीयूमध्ये नाही तर पाच रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. या रुग्णालयाला भेट देणाऱ्या संशयास्पद कोविड- 19 रुग्णांच्या संख्येत देखील कमालीची कमतरता आली असून 1000 लोक दर दिवशी वरून हा आकडा आता 50 लोकांएवढा खाली आला आहे. या रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांचा रिकव्हरी रेट हा 95 टक्के असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

फेब्रुवारी महिन्यात जेव्हा कोरोनाचा एकही रुग्ण समोर आला नव्हता तेव्हा महाराष्ट्रातील कस्तुरबा रुग्णालयामध्ये 20 बेडचे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले होते. मुंबईत पहिली केस 11 मार्चला समोर आली. जेव्हा दुबईवरून परतलेले वयोवृद्ध दांपत्य पॉझिटिव्ह आढळले होते. यांना कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 

कोविड 19 मुळे महाराष्ट्रात झालेला पहिला मृत्यू हा देखील याच रुग्णालयात झाला जेव्हा 17 मार्चला 64 वर्षीय व्यक्तिचा येथे मृत्यू झाला. आतापर्यंत या रुग्णालयात 3 हजार 194 कोविड 19 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

जेव्हा केसेसची संख्या अचानक वाढायला लागली. तेव्हा आमचं रुग्णालय हे एकच कोविड 19 विशेष रुग्णालय होतं किंवा दोन महिन्यात आम्ही बेडची संख्या 20 वरून 275 वर नेली. त्यावेळी आम्हाला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता भासत होती तेव्हा इतर पालिकेच्या रुग्णालयातून डॉक्टर्स आणि कर्मचारी इथे कोविड 19 ड्युटी वरती रुजू झाले आणि आठवरून डॉक्टरांची संख्या 25 वर गेली तर 195 अतिरिक्त नर्सेसची भरती करण्यात आली असं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी सांगितले.

आता कोविड 19 चे रुग्ण येण्याचं प्रमाण मंदावले असल्याने आम्ही बेडची संख्या 275 वरून 125 वर आणली आहे आणि इतर आजार हेपिटायटीस, कावीळ, ताप, फ्लू याकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे असं ही ते पुढे म्हणाले.

कोविड 19 रुग्णांच्या संख्येत झालेल्या कमतरतेमुळे रुग्णालयाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यास देखील सुरुवात केली आहे एकेकाळी हेच कर्मचारी दिवसाला 20-20 तास काम करत होते.

---------------------

(संपादन- पूजा विचारे)

Only 8 new patients day bombay Municipal Corporation Kasturba Hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com