रायगड जिल्ह्यात अवघे दोन टक्के कोरोनारुग्ण 

रायगड जिल्ह्यात अवघे दोन टक्के कोरोनारुग्ण 
Updated on

अलिबाग : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि येथील नागरिकांना केलेल्या प्रयत्नांना यश आले असून आता जिल्ह्यात केवळ 1 हजार 272 रुग्ण बाधित रुग्ण शिल्लक राहिले आहेत. ही टक्केवारी 2 टक्के इतकीच आहे. जिल्ह्यातील 51 हजार 789 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. 

सप्टेंबर - ऑक्‍टोबरमध्ये आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर जास्त लक्ष केंद्रित केले होते. त्याचबरोबर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍यात कोरोना रुग्णांवर उपचाराची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे कोरोनारुग्णांवर तत्काळ उपचार करणे शक्‍य झाले आहे. त्याचबरोबर मृत्युदर कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली. आता स्वतःहून संशयित रुग्ण कोरोना चाचणी करून घेत आहेत. पूर्वीप्रमाणे विलगीकरणाची सक्ती केली जात नसल्याने संशयित रुग्ण स्वतःहून रुग्णालयात येऊन तपासण्या करून घेत आहेत, असे म्हणणे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोव्हिड विषाणूचे स्वरूप बदलत असते. तसे झाल्यास रायगड जिल्ह्यात पुन्हा कोरोनारुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. यासाठी गाफील न राहता जिल्हा प्रशासनाने आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिल्याचे म्हणणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांचे आहे. 
 
रायगडमधील कोरोनाची स्थिती 
एकूण चाचण्या - 2 लाख 9 हजार 984 
एका दिवसातील चाचण्या- 2 हजार 944 
एकूण रुग्ण - 54 हजार 625 
आजपर्यंत बरे झालेले- 51 हजार 789 
विद्यमान रुग्ण- 1 हजार 272 
गृह विलगीकरण- 621 
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी - 156 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com