शिक्षणमंत्र्यांची माघार, अखेर शाळांना 14 दिवसांची दिवाळी सुट्टी

शिक्षणमंत्र्यांची माघार, अखेर शाळांना 14 दिवसांची दिवाळी सुट्टी

मुंबई, ता. 6 : ऑनलाइन शाळांना दिवाळी सुट्टी केवळ पाच दिवसांचा जाहीर केल्याने शिक्षक संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. अखेर शिक्षण मंत्र्यांनी नरमाईची भूमिका घेत दिवाळी सुट्टी 14 दिवसांची देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी मिळाली आहे.

कोरोना काळापासून शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. गणेशोत्सवाची सुट्टीही देण्यात न आल्याने शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. यातच दिवाळी सुट्टी 12 ते 16 नोव्हेंबर अशी केवळ पाच दिवस देण्यात आल्याने शिक्षक संघटनांनी या शासन निर्णयाचा विरोध केला होता.

शिक्षक संघटनांचा विरोध पाहून शिक्षणमंत्र्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भावनांचा आदर करून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी कळविले आहे. त्यानुसार 7 ते 20 नोव्हेंबर पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

पाच नोव्हेंबरमधील परीपत्रकानुसार 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी सुट्टी देण्यात आली होती. यात आता बदल करून 14 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासनाकडून याबाबतचे अधिकृत परिपत्रक काढण्यात आले आहे.  

teachers will get diwali vaccation for 14 days decision changed by varsha gaikwad

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com