पुस्तकांच्या गावात खुले प्रेक्षागृह : विनोद तावडे

Open house to book says Vinod Tawde
Open house to book says Vinod Tawde

मुंबई : पुस्तकांचे गाव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील भिलार गावामध्ये या प्रकल्पाच्या वर्षपूर्तीनिमित्त (4 मे) विविध कार्यक्रम होणार आहेत. याठिकाणी खुल्या प्रेक्षागृहाचे (ऍम्फी थिएटर) उद्‌घाटन, शब्द चांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम, नव्या पाच दालनांचे (पुस्तक घरांचे) उद्घाटन, वर्षपूर्ती स्मरणिकेचे प्रकाशन आणि अनेक मान्यवर साहित्यिक, कलाकार यांची प्रकल्पास भेट, असे कार्यक्रम होणार आहेत, अशी घोषणा मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी केली. 

पुस्तकांच्या गावात ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनास दिलेल्या जमिनीवर, सुमारे दोनशे रसिक आरामात बसून कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतील, असे खुले प्रेक्षागृह (ऍम्फी थिएटर) बांधून पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने, निसर्गरम्य ठिकाणी बांधण्यात आलेल्या या प्रेक्षागृहाचे उद्‌घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता होणार आहे.

गावातील श्रीराम मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या या खुल्या प्रेक्षागृहात सायंकाळी 5 वाजता शब्द चांदणे हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून विघ्नेश जोशी, निधी पटवर्धन, नचिकेत लेले, संदीप खरे, नंदेश उमप व कमलेश भडकमकर आदी दर्जेदार कलाकार हा साहित्य व वाचनसंस्कृती या विषयीचा सांगीतिक-साहित्यिक कार्यक्रम सादर करणार आहेत. 

हजारो पर्यटक-वाचकांच्या पसंतीस उतरलेले भारतातील पहिले पुस्तकांचे गाव, निसर्गरम्य खुल्या प्रेक्षागृहात दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवर साहित्यिकांशी अनौपचारिक गप्पा आणि पुस्तकांचे सान्निध्य यांचा आनंद घेण्यासाठी वर्षपूर्ती सोहळ्याचे निमित्त साधून 4 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील वाचनप्रेमींनी पुस्तकांच्या गावाला (भिलार) अवश्‍य भेट द्यावी. 
- विनोद तावडे, मराठी भाषा मंत्री. 

साहित्यिकांची मांदियाळी 

वर्षपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून स्पर्धा परीक्षा, नाटक व चित्रपट, चित्रमय पुस्तकं, कादंबरी (दालन) व चरित्रे- आत्मचरित्रे (दालन) या नव्या दालनांचा (पुस्तक घरांचा) शुभारंभ करण्यात येणार आहे. या प्रसंगी डॉ. सदानंद मोरे, भारत सासणे, डॉ. माधवी वैद्य, मोनिका गजेंद्रगडकर, योगेश सोमण, ल. म. कडू, प्रदीप निफाडकर, अतुल कहाते, विश्‍वास कुरुंदकर, किशोर पाठक, विनायक रानडे आदी साहित्य क्षेत्रातील मान्यवर पुस्तकांच्या गावास भेट देणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com