Maratha Reservation : अध्यादेश काढला तरी, मराठा विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश अडचणीतच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

मुंबई : मराठा विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार असला तरी, यात पुन्हा अडचणी येण्याची शक्यता आहे. या अध्यादेशाला खुल्या वर्गातील विद्यार्थी पालक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेश काढताना सरकारने खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांचादेखील विचार करावा, अशी मागणी खुल्या वर्गातील पालकांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय, त्या निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी खुल्या वर्गातील विद्यार्थी-पालकांनी केली.

खुल्या वर्गातील पालकांच्या मागणीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांना एसईबीसी कोट्यातुन प्रवेश न देता मेरिट नुसार प्रवेश द्यावा. अध्यादेश काढताना राज्य सरकराने आमच्यावर अन्याय होणार नाही याचा सुद्धा विचार व्हावा, अशी विनंती पालकांनी केली आहे.

आज (ता.17) दुपारी 12 वाजता राज्य कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीतच मराठा विद्यार्थ्यांच्या मेडिकल पीजी प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी सरकार अध्यादेश काढणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: open quota students will challenge maratha reservation ordinance in supreme court