ऑपरेशन कलॅप्सो फत्ते ! तीन कोटींच्या कोकेनसह ड्रग्स तस्करांची बडी टोळी DRI च्या अटकेत

अनिश पाटील
Thursday, 19 November 2020

आरोपींनी गेल्या चार महिन्यांपासून तीन किलो 300 ग्रॅम कोकेन त्रिनिदाद अँड टोबॅगो येथून कार्गोच्या माध्यमातून मागवले होते. 

मुंबई, ता. 19 : महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (DRI) तीन दिवस विशेष मोहिम राबवून आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी त्रिनिदाद अँड टोबॅगो येथून आलेले अर्धाकिलो कोकेन जप्त करण्यात आले असून त्याप्रकरणी दोन परदेशी नागरकांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत तीन कोटी रुपये आहे. चौकशीत आरोपींनी ऑगस्ट महिन्यापासून 20 कोटी रुपयांचे ड्रग्सची तस्करी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

महत्त्वाची बातमी : रात्रीची शांततेची वेळ पाहून टोळी साधते आपला डाव, लोकहो सावधान 'बच्चा चोर गॅंग' झालीये सक्रिय

गेल्या चार महिन्यात आरोपींनी तीन किलो 300 ग्रॅम कोकेन कुरियरमार्फत भारतात आणला आहे. नुकतीच विमातळावर हे ड्रग्स येणार अल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्यानुसार 17 नोव्हेंबरला प्रथम विमानतळावरून ड्रग्स जप्त करण्यात आले. ते स्वीकारण्यासाठी आलेल्या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिने नवीन पनवेल येथील एका परदेशी नागरीकला ड्रग्स देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर नवी मुंबईतून संशयीत परदेशी नागरीकाला अटक करण्यात आली. त्याासाठी तेथे खासगी टॅक्सीच्या माध्यमातून महिलेला नवी मुंबईत नेण्यात आले. तिच्याकडून ड्रग्स घेण्यासाठी परदेशी नागरीक आला असता त्याला पकडण्यात आले. त्यावेळी शेजारच्या रिक्षामध्ये त्याचा परदेशी साथीदार होता. त्याला संशय आल्यानंतर त्याने तेथून पलायन केले. सुमारे 400 मीटर दूर पाठलाग करून त्याला अखेर अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत मुंबईतील आणखी एका महिलेचा सहभाग निष्पन्न झाला. ती महिला फिरण्यासाठी उदयपूरला गेली असल्याचे निष्पन्न झाले. अखेर तिला तेथून अटक करण्यात आली. तिला मुंबईत आणण्यात आले आहे. ही महिला सराईत असून यापूर्वी मुंबई पोलिसांनीही तिला अटक केली होती.

महत्त्वाची बातमी :  तुम्ही जिथे मोठ्या उत्साहाने जातात असे तब्बल 29 मॉल्स धोकादायक, संपूर्ण यादी वाचा आणि जायचं की नाही ते ठरवा

आरोपींनी गेल्या चार महिन्यांपासून तीन किलो 300 ग्रॅम कोकेन त्रिनिदाद अँड टोबॅगो येथून कार्गोच्या माध्यमातून मागवले होते. कोणाला संशय येऊ नये. यासाठी या महिला ते कार्गो विमानतळावरून स्वीकारायच्या. त्यानंतर आफ्रियन परदेशी नागरीकांना ते देण्यात यायचे. त्यांच्या माध्यमातून पुढे विविध ठिकाणी त्याचे वितरण केले जायचे. ऑपरेशन कालॅप्सो नावाने ही संपूर्ण मोहिम राबवण्यात आली. तीन दिवस ही मोहिम सुरू होती.

Operation calypso by DRI busts international racket of illegal powder


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Operation calypso by DRI busts international racket of illegal powder