

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत खूप अस्वस्थता आहे. अनेक नेते त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल चिंतेत आहेत. यातच आता एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटातील सहा खासदार पक्ष सोडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे मोठा प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून लक्ष वेधून घेण्यासाठी अशी वक्तव्ये येत असल्याची चर्चा होत आहे.