अमोल मिटकरी यांनी भाजप-शिवसेना महायुतीवर घणाघात केला
अमोल मिटकरी यांनी भाजप-शिवसेना महायुतीवर घणाघात केला

विरोधकांना शरद पवारांची भिती!

नवी मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यावे लागत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भीती वाटते. या भीतीमुळेच पवारांना खोट्या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतू, ईडीच्या इतिहासात ईडी पहिल्यांदाच पवार यांना घाबरली असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अमोल मिटकरी यांनी रविवारी (ता. १४) सानपाडा विरोधकांना लगावला. 

बेलापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक गावडे यांच्या प्रचारानिमित्त डॉ. अमोल मिटकरी हे रविवारी नवी मुंबईत आले होते. या वेळी सानपाडा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते.

...तर सरकार पडणार
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील वातावरण फिरले असून ८० टक्के तरुण वर्ग हा राष्ट्रवादी व काँग्रेससोबत आहे. त्यामुळे भाजपचे नेते धास्तावले आहेत. या निवडणुकीत जर ईव्हीएमच्या माध्यमातून काही दगाफटका झाला नाही, तर नक्कीच हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही, असेही डॉ. अमोल मिटकरी यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com