
डोंबिवली : स्वातंत्र्यदिनी कत्तल खाना तसेच चिकन मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध होत असून विरोधी पक्षांनी प्रशासनाला यावरून कोंडीत पकडले आहे. 15 ऑगस्ट पर्यत पालिका प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर केडीएमसी हद्दीत 15 ऑगस्टला चिकन मटणची पार्टी करण्याचा बेत विरोधकांनी आखला आहे. याचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.