मुंबई विमानतळाच्या कामात मोठा गैरव्यवहार उघड; जीव्हीकेच्या अध्यक्षासह 'इतके' जण सीबीआयच्या रडारवर...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

बनावट वर्क ऑर्डरच्या मदतीने हे 310 कोटी रुपये खर्च झाल्याच दाखवण्यात आले. त्यामुळे एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाचे नुकसान झाले. त्याच्या साह्याने नऊ कंपन्यांनी बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट घेतले. त्यामुळे केंद्र सरकारचीही फसवणूक झाली. 

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय)  जीव्हीके उद्योग समूहाचे अध्यक्ष व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी,मुलगा जीव्ही संजीव रेड्डी यांच्यासह 11 जण तसेच इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात काही कंपन्यांचाही समावेश आहे. बनावट वर्क ऑर्डरच्या साह्याने तब्बल 705 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

थरथरत्या हाताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका,असू शकतो 'हा' मेंदूचा गंभीर आजार

याप्रकरणातील तक्रारीनुसार, मुंबई एअरपोर्टच्या सभोवताली 200 एकर जागा होती. ती जागा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला विकासासाठी देण्यात आली होती. त्यासाठी विविध कंपन्यांसोबत कंत्राट करून त्याचे पैसे त्यांना देण्यात आले. पण ही कामे प्रत्यक्षात झालीच नाही. बनावट वर्क ऑर्डरच्या मदतीने हे 310 कोटी रुपये खर्च झाल्याच दाखवण्यात आले. त्यामुळे एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाचे नुकसान झाले. त्याच्या साह्याने नऊ कंपन्यांनी बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट घेतले. त्यामुळे केंद्र सरकारचीही फसवणूक झाली. 

आता सुट्या पैशांची कटकट मिटली! बसमध्ये टिकीट घेतांना वापरा 'ही' पेमेंट पद्धत

याशिवाय या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडमधील 395 कोटी रुपयांची अधिकची रक्कमही वापरण्यात आली. याशिवाय मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या पॅरोलवर कामाला असलेले अनेक कर्मचारी प्रत्यक्षात हैद्राबाद येथील जीव्हीके ग्रुपच्या कार्यालयात कामाला होती. त्यांचा पगार मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडमधून निघत होता. जी वेंकट कृष्णा रेड्डी, जीव्ही संजीव रेड्डी यांच्यासह इतर आरोपींनी या काळात तब्बल 705 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. 

मुंबईत ऑरेंन्ज अलर्टचा इशारा! दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड अर्थात एमआयएएल नावाची जॉईंट व्हेंचर कंपनी जीव्हीके एअरपोर्ट होल्डिग्ज लिमिटेड, एअरपोर्ट अथॉरिटी इंडिया व इतर काही विदेशी कंपन्यांनी तयार केली होती. यात जीव्हीकेचे 50 टक्के शेअर्स होते, एएआयचे 26 टक्के शेअर्स होते. तर उर्वरित शेअर्समध्ये इतर कंपन्यांकडे होते. याप्रकरणी सीबीआयने जीव्हीके उद्योग समूहाचे अध्यक्ष व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा रेड्डी, मुलगा जीव्ही संजीव रेड्डी यांच्यासह गैरव्यवहारात सहभागी असलेल्या आरोपी कंपन्यांवर गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cbi reports complaints against gvk group amid developmenr of mumbai airport