गव्हाचे पीठ, मैद्याबाबत स्पष्ट उल्लेख हवा; अन्नपदार्थ उत्पादकांना आदेश

गव्हाचे पीठ, मैद्याबाबत स्पष्ट उल्लेख हवा; अन्नपदार्थ उत्पादकांना आदेश

मुंबई - अन्नपदार्थांत मैदा आहे की गव्हाचे पीठ, याबाबत आता वेष्टनावर माहिती दिली जाणार आहे. यापूर्वीही अस्तित्वात असलेल्या या नियमाचे उत्पादक कंपन्या पालन करत नसल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाकडे केली. त्यामुळे नियमाची अंमलबजावणी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. 

अन्नपदार्थांच्या पॅकिंगवर घटकांची माहिती इंग्रजीत दिलेली असते; मात्र गव्हाचे पीठ आणि मैदा यांच्या उल्लेखात संदिग्धता असते. गव्हाच्या पिठासाठी ‘व्हीट फ्लोअर’ असा उल्लेख अपेक्षित असताना कित्येकदा ‘रिफाईण्ड फ्लोअर’ असे लिहिले जाते. हा उल्लेख चुकीचा असल्याचा मुद्दा व्यापाऱ्यांनी मांडला. ‘रिफाईण्ड फ्लोअर’ म्हणजे प्रत्यक्षात मैद्याचा वापर केला जातो. त्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडतो. 

कायद्यानुसार गव्हाच्या पिठासाठी ‘व्हीट फ्लोअर’ आणि मैद्यासाठी ‘रिफाईण्ड फ्लोअर’ असे लिहिणे बंधनकारक आहे. परंतु, अन्नपदार्थ उत्पादक कंपन्या योग्य माहिती देत नाहीत, अशी तक्रार व्यापाऱ्यांनी अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाकडे केली. याबाबत ग्राहकांनीही तक्रारी केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

त्यानुसार दुकानांतून विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांतील घटक स्पष्ट करण्याचा आदेश अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने दिला आहे. गव्हाचे पीठ आणि मैदा याबाबत कंपन्यांनी स्पष्टता ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

अन्नपदार्थांच्या वेष्टनावर अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने सांगितलेले बदल करण्यासाठी ३० मार्चपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. 
- डॉ. पल्लवी दराडे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com