धार्मिक स्थळाकडून आदेशाची पायमल्ली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

ठाणे - धार्मिक सण आणि उत्सवांदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही शहरातील शांतता क्षेत्रात याची पायमल्ली होत आहे. याबाबतची अवमान याचिका जनहित याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ठाण्यातील म. हो. विद्यालयाच्या परिसरात असलेल्या धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपकामुळे येथील शांतता क्षेत्राच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचा उल्लेख डॉ. बेडेकर यांनी याचिकेत केला आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याची माहिती डॉ.

ठाणे - धार्मिक सण आणि उत्सवांदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही शहरातील शांतता क्षेत्रात याची पायमल्ली होत आहे. याबाबतची अवमान याचिका जनहित याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ठाण्यातील म. हो. विद्यालयाच्या परिसरात असलेल्या धार्मिक स्थळावरील ध्वनिक्षेपकामुळे येथील शांतता क्षेत्राच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचा उल्लेख डॉ. बेडेकर यांनी याचिकेत केला आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याची माहिती डॉ. बेडेकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

सण, उत्सव आणि धार्मिक स्थळांवरून मोठ्या आवाजाचे स्पिकर्स, डीजे, म्युझिक सिस्टीम लावून ध्वनिप्रदूषण केले जात असून, त्याविरोधात ठाण्यात डॉ. बेडेकर यांनी आवाज उठवला. उत्सवांदरम्यान होणारा धिंगाणा थांबवण्यासाठी त्यांनी याविषयी सातत्याने प्रयत्न सुरू करून न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणांना दिले होते. धार्मिक सण, उत्सव आणि धार्मिक स्थळांमधून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा नागरिकांना त्रास होता कामा नये. नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही पोलिस आणि प्रशासनाला देण्यात आले होते. 

ठाणे शहरातील तलावपाळी परिसरामध्ये म. हो. विद्यालयाचा परिसर असून, हा शांतता क्षेत्र आहे. या भागात धार्मिक स्थळ आहे. त्यावर लावण्यात आलेल्या ध्वनिक्षेपकावरील दिवसभर सुरू असणाऱ्या मोठ्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. बेडेकर यांनी पोलिसांकडे माहिती अधिकाराखाली या प्रार्थनास्थळाला ध्वनिप्रदूषण करण्याची परवानगी दिली आहे का, याविषयी माहिती मागवली. पोलिस प्रशासनाने यासंदर्भात कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. याआधारे बेडेकर यांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ए. व्ही. पोफळे आणि राज्य सरकारविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. 

आमचा लढा केवळ नागरिकांच्या हक्कांसाठी 

ध्वनिप्रदूषणाविरोधात आमची लढाई असून, त्यामध्ये कोणत्याही धर्माच्या विरोधात आम्ही नसून नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. पोलिस चांगले काम करत असले तरी त्यांच्याकडून ध्वनिप्रदूषणाविषयी अधिक चांगल्या कामांची अपेक्षा आहे. 
डॉ. महेश बेडेकर, जनहित याचिकाकर्ते 

Web Title: From the order overrides religious places