महावितरणकडून वीज बिल वसुलीच्या सूचना, 64.52 लाख ग्राहकांची बिले थकीत

महावितरणकडून वीज बिल वसुलीच्या सूचना, 64.52 लाख ग्राहकांची बिले थकीत

मुंबई: लॉकडाऊनच्या कालावधीपासून राज्यातील तब्बल 64.52 लाख वीज ग्राहकांनी बिलाची कोणतीही रक्कम भरलेली नाही. यामुळे महावितरणला आर्थिक अडचणीला समोर जावे लागत असल्याने महावितरणने थकीत रक्कम वसूल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत. यामुळे भरमसाठ वीज बिलाबाबत राज्य सरकारकडून दिलासा मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांना थकीत रक्कम भरावी लागणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले आली. याबाबत ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष आहे. ऊर्जामंत्री यांनी वीज ग्राहकांना दिवाळीपूर्वी दिलासा देण्याचे विधान केले होते. मात्र अजूनही ग्राहकांना सरकारकडून दिलासा मिळालेला नाही. राज्य सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक ग्राहकांनी वीज बिले भरलेली नाहीत. त्यामुळे महावितरण कंपनीला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांनी वीज बिल न भरल्यास राज्यातील जनतेला अखंडित वीज पुरवठा करणे कठीण होणार आहे. त्यामुळे महावितरणने थकीत रक्कम वसूल करण्याची मोहिम पुन्हा हाती घेतली आहे. त्यानुसार महावितरणने वीज बिल वसुलीसंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. 

यामध्ये महावितरणने वीज ग्राहकांना दिलेली बिले कशी योग्य आहेत हे ग्राहकांना समजवून सांगण्यात येणार आहे. वीज बिल वसुलीसाठी मेळावे घेण्यात यावेत. वीज ग्राहकांना टप्याटप्याने वीज बिल भरण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. तसेच एकदाच तोडगा काढून ग्राहक वीज बिल भरू शकणार आहेत. थकबाकी वसुली करण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. थकबाकी वसुली मोहीम सुरू झाल्याने आर्थिक संकटात असलेल्या वीज ग्राहकांना आणखी त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

1 एप्रिल 2020 पासून एकही वीज बिल न भरणारे वीज ग्राहक

लघुदाब ( कृषी वगळून) - 64 लाख 52 हजार 150 ग्राहकांनी 11 कोटी 2 लाख 77 हजार रक्कम थकविली आहे.

लघुदाब एकूण - 98 लाख 5 हजार 584 ग्राहकांनी 47 कोटी 4 हजार रक्कम भरलेली नाही.

औरंगाबाद प्रादेशिक विभाग
लघुदाब (कृषी वगळून) - 4 लाख 7 हजार 564 ग्राहकांनी 3 कोटी 30 हजार रक्कम भरलेली नाही.
लघुदाब एकूण - 19 लाख 12 हजार 0892 ग्राहकांनी 13 कोटी 5 लाख 65 हजार

कोकण प्रादेशिक विभाग
लघुदाब (कृषी वगळून) - 19 लाख 76 हजार 250 ग्राहकांनी 3 कोटी 17 लाख रक्कम थकविली आहे.
लघुदाब एकूण - 29 लाख 17 हजार 893 ग्राहकांनी 1 कोटी 45 लाख रक्कम थकविली आहे.

नागपूर प्रादेशिक विभाग
लघुदाब (कृषी वगळून) - 14 लाख 41 हजार 679 ग्राहकांनी 2 कोटी 4 लाख 36 हजार रक्कम थकविली आहे.
लघुदाब एकूण - 20 लाख 29 हजार 162 ग्राहकांनी 7 कोटी 3 लाख 54 हजार रक्कम थकविली आहे.

पुणे प्रादेशिक विभाग
लघुदाब (कृषी वगळून) - 19 लाख 26 हजार 657 ग्राहकांनी 2 कोटी 6 लाख 40 हजार रक्कम थकविली आहे.
लघुदाब एकूण - 29 लाख 53 हजार 637 ग्राहकांनी 1 कोटी 14 लाख 98 हजार रक्कम थकविली आहे.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Order recovery of overdue electricity bill from MSEDCL 64.52 lakh customer bills outstanding

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com