रोडपालीतील रुग्णामुळे तिघांना नवजीवन

अवयव दान
अवयव दान

नवीन पनवेल (वार्ताहर) ः अवयवदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. मृत्यूनंतर सर्व नष्ट होत असले तरीही अवयवदानाच्या रूपामध्ये पुन्हा या सृष्टीमध्ये जिवंत राहता येते.

नेत्रदानामुळे हे जग पाहू शकतो. तसेच अनेकांचे जीवही वाचवूू शकतो. एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल झालेले रुग्ण दशरथ विनायक गायकवाड (६७) यांनी यकृत, दोन्ही मूत्रपिंडे आणि दोन डोळे असे अवयवदान केले. त्यामुळे मूत्रपिंड आणि यकृताच्या प्रतीक्षेत असलेल्या तीन रुग्णांना यातून नवजीवन; तर नेत्रदानामुळे दोन रुग्णांना दृष्टी मिळणार आहे.
गायकवाड यांना ब्रेन हॅमरेजमुळे त्यांच्या मेंदूचे कार्य थांबले होते. दरम्यान, रुग्णालयातर्फे अवयवदानाविषयी आव्हान केल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे मूत्रपिंड, यकृत व डोळे हे अवयव दान करण्यात आले.

रोडपाली येथील रुग्ण दशरथ विनायक गायकवाड यांना ब्रेन हॅमरेजमुळे सोमवारी (ता. २३) कामोठे येथील एमजीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते; मात्र रुग्ण उपचारास प्रतिसाद देत नव्हता. अखेर गुरुवारी (ता.२६) दुपारी गायकवाड यांच्या मेंदूचे कार्य थांबले असल्याचे डॉक्‍टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. या वेळी एमजीएम हॉस्पिटलचे ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर एकनाथ बागुल यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानाविषयी माहिती दिली. तसेच रुग्णाची पत्नी तुळसाबाई गायकवाड, मुलगा मंगेश व विनोद यांनी अवयवदानासाठी संमती दिली. 

रुग्णांच्या नातेवाईकांचा होकार आल्यानंतर लगेच ‘झोनल ट्रान्सप्लांन्ट को-ऑर्डिनेशन कमिटी’ (झेडटीसीसी) सायन, मुंबई विभागाच्या समन्वय समिती यांच्याशी संपर्क साधून अवयवदानाविषयी माहिती दिली.
- डॉ. के. आर. सलगोत्रा, एमजीएम हॉस्पिटल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com