esakal | "सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतजी..."; चित्रा वाघ यांची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra-Wagh-Sanjay-Raut

"सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतजी..."; चित्रा वाघ यांची टीका

sakal_logo
By
विराज भागवत

संजय राऊतांनी लिहिलेल्या एक लेखावरून घेतला समाचार

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे कायम मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडत असतात. त्यावर भाजपकडून उत्तरही दिलं जातं. 'सामना'मधील रविवारच्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूबद्दल परखड मत मांडले. त्या लेखाचा भाजप प्रदेशच्या उपाध्यक्षा आणि भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी चित्रा वाघ यांनी चांगलाच समाचार घेतला. (Shivsena MP Sanjay Raut Article on Stan Swami BJP Leader Chitra Wagh gets angry calls him Sonia Sena speaker)

हेही वाचा: "संजय राऊत, तुम्हीही हे ध्यानातच ठेवा..."; चित्रा वाघ भडकल्या

"सामना चे कार्यकारी संपादक आणि सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतजी हे फादर स्टॅन स्वामी, जे कोर्टाच्या निर्देशानुसार नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळे कारागृहात होते, त्यांचा मृत्यू झाल्याने प्रचंड अस्वस्थ झालेले दिसतात. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावेत यासाठी सामना वृत्तपत्राची निर्मिती करण्यात आली होती. पण संजय राऊत स्वत:च्या मखलाशीसाठी त्या विचारांना बगल देत सामना चा गैरवापर करत आहेत. आता तर तुम्ही हद्दच ओलांडलीत. भीमा-कोरेगाव दंगलीतील मुख्य सूत्रधार आरोपी असलेल्यांना तुम्ही लेखणीतून बळ द्यायचं काम करत आहात. तसेच, त्यांची तुलना तुम्ही कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी करत आहात. मोदींचे सरकार स्टॅन स्वामी यांनी घाबरत होते, असं तुम्ही म्हणाला आहात. पण एका गोष्टीचा विचार करा की या नक्षलवाद्यांना रसद पुरवणाऱ्या चीनी ड्रॅगनला मोदीजी घाबरत नाहीत, तर मग या अशा लोकांना ते स्वप्नात तरी घाबरतील का?", अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संजय राऊतांच्या लेखाचा समाचार घेतला.

हेही वाचा: "सत्ता टिकवण्यासाठी हिंदुत्व तर सोडलंच आहे, पण किमान..."

संजय राऊत लेखात काय म्हणाले?

संजय राऊत यांनी नुकतेच मृत्यू पावलेले फादर स्टॅन स्वामी यांच्याबद्दल 'फादर स्टॅन स्वामी! एका गलितगात्र म्हाताऱ्याची भीती!' या शीर्षकाचा एक लेख लिहिला. त्या लेखामध्ये त्यांनी लिहिले...

मुस्कटदाबी करणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी यांचे नाव प्रसिद्ध होत असताना मुंबईत फादर स्टॅन स्वामी यांचा तडफडून आणि गुदमरून मृत्यू झाला. स्वामी हे राष्ट्रीय तपास एजन्सीच्या ‘कस्टडी’त बऱ्याच काळापासून होते. त्यांचे वय 84 वर्षे. त्यांना ऐकता, बोलता येत नव्हते. दिसतही नव्हते. त्यांच्या हालचाली व श्वास पूर्ण मंदावला असताना तुरुंगातच त्यांना कोरोनाने ग्रासले. जीवनाच्या अंतिम समयी त्यांना झारखंड येथे जाऊन मित्रांसमवेत वेळ घालवायचा होता. पण स्वामी यांच्यावर दहशतवाद, फुटीरतावाद, राज्य उलथवून लावण्याच्या कटात सहभागी होण्याचा आरोप होता. 84 वर्षांचा एक गलितगात्र राजशकट उलथवून टाकू शकतो इतका हा देश भुसभुशीत पायावर उभा आहे काय?

loading image