...नाहीतर सार्वजनिक ठिकाणी 'ऑक्सिजन हॉटस्पॉट' लावावे लागतील

...नाहीतर सार्वजनिक ठिकाणी 'ऑक्सिजन हॉटस्पॉट' लावावे लागतील

मुंबई:  दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरात तापमान वाढत चाललं आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षात जगभरात मोठ्या प्रमाणात वणव्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या. अशातच दिवसागणिक जगभरात प्रदूषणात वाढ होतेय. त्याचे गंभीर दुष्परिणाम आपण पाहतोय आणि भोगतोय सुद्धा. नुकतंच दिल्लीत पराकोटीचं वाढलेलं प्रदूषण चिंता वाढवणारं आहे. याचसोबत मुंबईतदेखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढताना पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणच्या रक्षणासाठी शपथ आज दिली.

खतरनाक - #करोना व्हायरस : बचावासाठी मुंबईत या केल्या उपाययोजना

"आपण आताच पर्यावरण रक्षणाचा विडा उचलला नाही आणि प्रदूषण नियंत्रित केले नाही तर जसं घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी इंटरनेटसाठी हॉटस्पॉट वापरतो, तसंच पुढच्या ५ वर्षात आपल्याला ऑक्सिजन हॉटस्पॉटची गरज भासेल असं आदित्य ठाकरे यांनी  म्हटलंय. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी हे म्हटलंय. वाढत्या प्रदूषणामुळे हवेत धुरक्याचं प्रमाण वाढत जाईल आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जाईल", असंही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या हवेत प्रचंड प्रमाणात धुरक्याचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळालं. ऐन थंडीमद्धे मुंबईत प्रदूषण सर्वात जास्त असल्याचं देखील नोंदवलं गेलं. त्यामुळे आताच जर वेळीच प्रदूषणाला रोखलं नाही तर चौका-चौकात ऑक्सिजन हॉटस्पॉट वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते.

मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण

  • चेंबूर-- २०९ वाईट
  • माझगाव-- २६१ वाईट
  • नवी मुंबई-- २६९ वाईट
  • बोरीवली-- २३२ वाईट
  • मालाड --२१४ वाईट
  • बीकेसी-- ३२४ अत्यंत वाईट
  • वरळी-- २४४ वाईट  

otherwise we will have to install oxygen hot spots in public places 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com