Mumbai Metro: लोकल नव्हे, मेट्रो ठरतेय जीवनवाहिनी! चार दिवसांत २० लाख मुंबईकरांचा प्रवास

MMRDA: १६-१९ ऑगस्ट या चार दिवसांत तब्बल २० लाखांहून अधिक मुंबईकरांनी मेट्रोने प्रवास केला. त्यामुळे मेट्रो आता मुंबईकरांची जीवनवाहिनी ठरताना दिसत आहे.
Mumbai Metro
Mumbai MetroESakal
Updated on

मुंबई : मुंबईत चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते वाहतुकीसह लोकल सेवा विस्कळित झाली; मात्र कोणत्याही अडथळ्याविना मेट्रो सेवा सुरळीत सुरू होती. सर्वत्र जोरधारा सुरू असताना मुंबईकरांनी मेट्रो प्रवासाला पसंती दिली. १६-१९ ऑगस्ट या चार दिवसांत तब्बल २० लाखांहून अधिक मुंबईकरांनी मेट्रोने प्रवास केला. त्यामुळे मेट्रो आता मुंबईकरांची जीवनवाहिनी ठरताना दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com