दहा महिन्यात पाचशेहून अधिक मुलींचे अपहरण 

दहा महिन्यात पाचशेहून अधिक मुलींचे अपहरण 

ठाणे : ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील बालकांवरील होणाऱ्या अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यात एकूण 90 टक्के दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच या वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत अपहरण झालेल्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 273 मुलांपैकी 61 मुले आणि 530 मुलींपैकी 172 मुली अद्यापही सापडल्या नसून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

ठाणे पोलिस आयुक्तालयात येत्या 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत सर्वत्र बालकांची सुरक्षितता (बालकांचे हक्क व सुरक्षितता) या संदर्भात जनजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे. यामध्ये बालकांसंदर्भातील विविध कायदे, विधीसंघर्षित बालक, बालकांचे हक्क, बालकामगार, बालविवाह, बालकांवरील लैंगिक अत्याचार, मादक द्रव्यांचा गैरवापर आणि त्यांचा दुष्परिणाम या विषयावर जनजागृती केली जाणार आहे.

तसेच बालकांवरील होणारे अत्याचार समजून घेणे किंबहुना त्याबाबतची दखल घेऊन प्रतिबंध करण्याकरिता ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील 35 पोलिस ठाणी व गुन्हे शाखा स्तरावर बालकांच्या संरक्षणाकरिता पोलिस काका आणि पोलिस दीदी कार्यरत आहेत. या पोलिस काका आणि पोलिस दीदींद्वारे पीडित बालकांवर होणारे अत्याचार व त्यांची सुरक्षितता याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. 

दरम्यान, आयुक्तालयात 2018 मध्ये एकूण 365 मुले; तर 660 मुलींचे अपहरण झाले, त्यापैकी 327 मुले आणि 578 मुलींचा शोध लागला; तर 38 मुले आणि 89 मुलींचा अद्यापही शोध लागलेला नाही; तर 2019 च्या पहिल्या दहा महिन्यात (जानेवारी ते ऑक्‍टोबर) 273 मुले आणि 530 मुलींचे अपहरण झाले. त्यापैकी 212 मुले आणि 358 मुली स्वगृही परतल्या आहेत; तर 61 मुले आणि 172 मुलींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

web title : Over five hundred girls kidnapped in just ten months

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com