Kalyan Kasara Local News: खर्डी-कसारा तिसरी मार्गिका निर्णायक टप्प्यात; १२ मे २०२६ पासून ओव्हरहेड वायर चार्ज, लोकल वेग व फेऱ्यांमध्ये वाढ

खर्डी-कसारा तिसऱ्या मार्गिकेचे ओव्हरहेड वायर चार्जिंग १२ मे २०२६ पासून; लोकल वेग, क्षमता आणि वेळपालनात मोठी सुधारणा होण्याची शक्यता
"कसारा लोकलचा 'खोळंबा' आता इतिहास जमा होणार!" खर्डी-कसारा तिसरी मार्गिका सज्ज; १२ मे पासून हाय-व्होल्टेज वारे.

"कसारा लोकलचा 'खोळंबा' आता इतिहास जमा होणार!" खर्डी-कसारा तिसरी मार्गिका सज्ज; १२ मे पासून हाय-व्होल्टेज वारे.

sakal
Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : कल्याण-कसारा मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. तिसऱ्या मार्गिकेचे काम आता निर्णायक टप्प्यात पोहोचले असून खर्डी ते कसारा दरम्यानचे सुमारे १३ किलोमीटरचे ओव्हर हेड वायरचे काम पूर्ण झाले आहे. या भागातील ओव्हरहेड वायर १२ मे २०२६ पासून चार्ज करण्यात येणार असल्याने या संपूर्ण पट्ट्यात लोकल तसेच मेल-एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com