esakal | लठ्ठपणा होणार कमी, महापालिकेच्या KEM रुग्णालयातील डाॅक्टरांनी बनवले उपकरण!
sakal

बोलून बातमी शोधा

kem hospital

लठ्ठपणा होणार कमी, महापालिकेच्या KEM रुग्णालयातील डाॅक्टरांनी बनवले उपकरण!

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : मानवी शरिरातील (Human Body) रक्तवाहिन्यातून रक्ताचा प्रवाह (Blood Pressure) कमी करुन लठ्ठपणा कमी करु शकेल, असे उपकरण (Machin) तयार करण्यात महानगरपालिकेच्या (BMC) केईएम (KEM) रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे. या उपकरणाला अमेरीकन पेटंट ऑफिसने पेटंट दिले आहे. केईएम रुग्णालयाचे अधिष्टाते डॉ.हेमंत देशमुख (Dr Hemant Deshmukh) आणि इंटरर्वेशनल रेडिओलॉजीचे डॉ.क्रांतीकुमार राठोड 2016 पासून रक्तवाहीन्यांच्या आजारावर संशोधन करत आहेत. (Over Weight reducing Machin created by KEM Hospital Doctors)

हेही वाचा: मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर 0.7 % पर्यंत घसरला!

यासाठी एक वैद्यकिय उपकरण बनवण्यात आले. या उपकरणा अंतर्गत रक्ताचा प्रवाह कमी केल्यास लठ्ठपणा कमी करता येईल, याबद्दलचे संकल्पित नमुने अमेरिकेच्या पेटंट ऑफिसकडे दाखल करण्यात आले. पाच वर्षांच्या अविरत संकल्पनेनंतर अमेरिकन पेंटंट ऑफिसने ही ‘बौद्धिक संपत्ती’, संकल्पना जगात एकमेव असल्याची ग्वाही देत पेंटट बहाल केले आहे. या उपकरणाच्या आधारे स्थुलपणावर उपचार करण्याबाबत पुढील संशोधन सुरू राहणार आहे.याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी डॉ.देशमुख आणि राठोड यांचा गौरव केला.उपचारात पालिकेच्या रुग्णालयांचे नाव जगात मानले जाते.त्याच बरोबर संशोधनातही पालिकेचे डॉक्टर जगात नाव मिळवत आहेत.अशी भावना महापौरांनी यावेळी व्यक्त केली.

जगभरात कुपोषणा पेक्षा लठ्ठ पणाची समस्या गंभिर आहे.पुर्वी फक्त उच्चभ्रु वर्गात लठत्वाचे रुग्ण आढळत होते.मात्र,आता सर्वसामान्य कुटूंबातही लठ्ठत्वाचे रुग्ण आढऴत आहेत.लठ्ठपणामुळे ह्रदयविकार,धमन्यांचे आजार यांचा धोका वाढतो.

loading image