ताडीचे अतिसेवन बेतले जीवावर, डोंबिवलीत दोघांचा मृत्यू

 killed in Dombivali
killed in Dombivalisakal

डोंबिवली : ताडीचे अतिसेवन दोघा मित्रांच्या जीवावर बेतले असून त्यांचा त्यात मृत्यू (Death) झाल्याची घटना डोंबिवली कोपर परिसरात घडली आहे. सचिन पाडमुख (वय 22) व स्वप्नील चोळके (वय 30) अशी मयत तरुणांची नावे आहेत. स्वप्नील हा डोंबिवली शहर (Dombivli City) वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून काम करत असून दोन महिन्यांपासून तो सुट्टीवर होता. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात ताडी विक्रेता रवी बथनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 killed in Dombivali
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सिंहगड पर्यटकांना बंद, वन विभागाची माहिती

डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात स्वप्निल व सचिन राहण्यास होते. सोमवारी रात्री हे दोघे इतर दोन मित्रांसह कोपर परिसरातच असणाऱ्या ताडी केंद्रावर ताडी पिण्यासाठी गेले होते. रात्री 9 च्या सुमारास ते घरी परतत असताना त्यांना रस्त्यात त्रास जाणवू लागला. मित्रांनी त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेले मात्र त्यांचा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण मधील रुक्मिणी बाई रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

 killed in Dombivali
अनैतिक संबंध नसतानाही झाली मारहाण; मग त्याने कवटाळले मृत्यूला

याप्रकरणी राहुल पाडमुख यांनी दाखल केलेल्या तक्रारी वरून ताडी विक्रेता रवी बथनी याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान या दोघांचा मृत्यू ताडीचे अतिसेवन केल्याने त्यांच्या हृदयावर ताण येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com