ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत|overhead wires damaged on harbour line | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

local train

ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत

मानखुर्द ते पनवेल दरम्यान हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. ऐन सकाळी ही घटना घडल्याने चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे.

मानखुर्द गोवंडीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने पनवेलकडून सीएसटीएमला जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे पनवेल ते सीएसटीएम आणि सीएसटीएम ते पनवेल लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.

हेही वाचा: मुंबई: पैशांसाठी नातेवाईकांनीच घडवून आणला मुलीवर बलात्कार

रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकांवर तुफान गर्दी झाली. त्यातच मुंबई आणि नवी मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला आहे त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.

हेही वाचा: सलग तीन दिवसांच्या चौकशीनंतर राहुल गांधी थकले, विश्रांतीसाठी मागितला वेळ

मध्यरात्रीपासून मुंबईसह नवी मुंबईत पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, पहिल्याच पावसात मानखुर्द ते पनवेल दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईला येणारी लोकल सेवा नवी मुंबईतच थांबल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

Web Title: Overhead Wires Damaged On Harbour Line

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top