Free De-Addiction Treatment: व्यसनमुक्तीसाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद; जीटी रुग्णालयात मोफत उपचार आणि समुपदेशन

Free Treatment For De-Addiction At GT Hospital: जीटी रुग्णालयात व्यसनमुक्तीसाठी मोफत उपचार आणि समुपदेशन सेवा सुरू असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे.
Free De-Addiction Treatment
Free De-Addiction Treatment sakal
Updated on

Free Addiction Counseling Services in GT Hospital Mumbai: मुंबईसह उपनगरांतील तरुण मंडळी वेगवेगळ्या व्यसनांच्या विळख्यात अडकली आहे. राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील येणाऱ्या व्यसनमुक्ती केंद्रात दरवर्षी व्यसन मुक्तीसाठी तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे .

सर्वाधिक व्यसन दारू, अमली पदार्थ, सोल्यूशन्स, गांजा, तंबाखूचे केले जात असून, यात पाच ते सात टक्के १८ वर्षाखालील किशोरवयीन मुलांचादेखील समावेश आहे. वाढत्या व्यसनामुळे डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली असून शाळेतील शिक्षक, पोलिस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचे पालक यांनी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते सांगतात.

तरुण व्यसनांच्या विळख्यात अडकले असून दारू, नार्कोटिक्‍स आणि इतर व्यसन करण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या केंद्रांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे. सामान्यपणे या केंद्रात दारू, ब्राऊन शुगर, चरस-गांजा, एमडी- स्टिम्युलन ड्रग्ज, झोपेच्या गोळ्या घेणे या व्यसनांसाठी नागरिक येथे दाखल होतात.

Free De-Addiction Treatment
Rural Youth Drug Addiction: गावातील युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढली; पोलिस आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजारांचे प्रमाणही वाढत आहे

काही जणांना दाखल करुन उपचार करावे लागतात. या केंद्रात समुपदेशक उपलब्ध असल्याने रुग्णांचे समुपदेशनही मोफत केले जाते. त्‍यामुळे रुग्‍णांना कमी खर्चात उपचार घेता येत आहेत. जीटी रुग्णालयातील मानसोपचार विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. समीर नेगी म्‍हणाले की, मानसोपचारतज्ज्ञ म्हणून आमची भूमिका जितकी महत्त्वाची आहे, तितकाच पालकांचा उपचारातील सहभाग व आधार व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्‍या मुलांसाठी महत्त्वाचा आहे, असे त्‍यांनी सांगितले.

मित्र-मैत्रिणींचा दबाव,मानसिक ताण, बिघडलेले नातेसंबंध यामुळे तरुण-तरुणी व्यसन करत असल्‍याचे उपचारादरम्‍यान समोर येत असल्‍याची माहिती जी. टी. रुग्‍णालयातील डॉक्‍टरांनी दिली.

१८ ते ३० वयोगटात सर्वाधिक तरुण

एका महिन्यात ओपीडीला जवळपास नवे व जुने असे १५० ते २०० रुग्ण येतात. पूर्वी व्यसन करण्याचा एक ठराविक वयोगट होता. मात्र, आता वयोगट कमी होत चालला आहे. किशोरवयीन गटातील ५ टक्के मुले- मुली ही त्यांच्या लक्षणांवरून उपचारांसाठी दाखल होत आहेत.

संस्थांचीदेखील मदत

जीटी रुग्णालयातील या व्यसनमुक्ती केंद्रात दररोज व्यसनमुक्तीची विशेष ओपीडी चालवली जाते. येथे वेगवेगळी तज्ज्ञ मंडळी काही संस्था रुग्णांना व्यसनमुक्तीसंदर्भात औषधोपचार आणि सल्लामसलत करतात.

व्यसनमुक्तीसाठी १२ केंद्रे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत केईएम राजावाडी, भरडावाडी, जीटी रुग्णालय, महाराष्ट्रात उस्मानाबाद, धुळे, नागपूर, चेन्नई, इंदोर, हैदराबाद, सूरत आणि गोवा इथे देखील केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या प्रत्येक केंद्रात समुपदेशक, औषधोपचार, वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतात.

सध्याची तरुणपिढी नवनवीन गोष्टींकडे जास्त प्रमाणात आकर्षित होते. अनेकदा झोपेच्या गोळ्यांमध्ये कफ सिरप, सोल्यूशन्स याशिवाय काही ठराविक ड्रग्ज घेतले जातात. दारु, सिगारेट, चरस-गांजा हे हल्ली सामान्य आहे. महाविद्यालयात शिकणारी अनेक तरुण मुले इथे येतात.

- डॉ. लविष छायल,

मानसोपचार विभाग, निवासी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com