esakal | "गोपीचंद पडळकर यांना मानसोपचाराची गरज"; रुपाली चाकणकर यांचे प्रत्युत्तर.. 
sakal

बोलून बातमी शोधा

gopichand padalkar and rupali chakankar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य शब्दांत टीका करणारे गोपीचंद पडळकर यांना मानसोपचारांची गरज आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहे.

"गोपीचंद पडळकर यांना मानसोपचाराची गरज"; रुपाली चाकणकर यांचे प्रत्युत्तर.. 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य शब्दांत टीका करणारे गोपीचंद पडळकर यांना मानसोपचारांची गरज आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहे.

पडळकर यांनी आज शरद पवारांवर टीका केली आहे. त्याला उद्देशून चाकणकर यांनी हे प्रत्युत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत बारामतीकरांनी पडळकर यांच्यासारखा व्हायरस बाजूला ठेवला त्याबद्दल बारामतीकरांचे आभार असा टोलाही चाकणकर यांनी लगावला आहे. 

हेही वाचा: आता फक्त अर्धा तासात होणार कोरोनाची चाचणी! बृहन्मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय

"आज पवार यांच्यावर टीका करून पडळकर यांनी आपली वैचारिक पातळी दाखवून दिली आहे. पडळकर यांचे जेवढे वय आहे तेवढी पवार यांची राजकीय कारकीर्द आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे. बारामतीत जप्त झालेले डिपॉझिट आणि त्यातून आलेले नैराश्य यामुळे पडळकर यांनी हे हीन दर्जाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे, हेच दिसून येते. त्यामुळे त्यांनी मानसोपचार करून घ्यावेत", असे चाकणकर यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा: रुग्णवाहिकेशी केला संपर्क, मागितले अवाच्या सव्वा पैसे, शेवटी ओढवली 'ही' वेळ; मुख्यमंत्रीसाहेब पाहताय ना ?

"यापुढे पवार यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी त्यांचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांचा आदर्श घ्यावा. पंतप्रधान मोदी जेव्हा बारामतीला येतात तेव्हा ते पवार यांच्या कार्याची स्तुती करतात हे त्यांनी ध्यानात ठेवावे. कारण भाजपाची असभ्य संस्कृती पडळकर यांनी फार लवकर आत्मसात केली आहे", असाही टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.

Padalkar needs psychotherapy said rupali chakankar