Paduka Darshan Sohala 2024 : केसरकर यांच्या उपस्थितीत काकड आरती

बेलापूरमधील सकाळ भवन येथे पहाटे श्रीगुरू पादुकांसमोर काकड आरती करण्यात आली. या वेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Paduka Darshan sohala 2024 sri family guide initiative Kakad Aarti in the presence of Kesarkar
Paduka Darshan sohala 2024 sri family guide initiative Kakad Aarti in the presence of KesarkarSakal

नवी मुंबई : बेलापूरमधील सकाळ भवन येथे पहाटे श्रीगुरू पादुकांसमोर काकड आरती करण्यात आली. या वेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यात संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत सेनामहाराज, संत नरहरी सोनार, संत निळोबाराय महाराज, संत नामदेव महाराज यांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. श्री एकनाथी भागवत आणि तुकाराम गाथा यांचे पूजन केले.

श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यासाठी राज्यभरातून विविध संस्थानांच्या आलेल्या ज्येष्ठ पदाधिकारी, वारकरी यांनी या वेळी काकड आरती आणि नंतर पूजन केले. त्यात शालेय शिक्षण मंत्री तल्लीन होऊन सहभागी झाले होते. त्यांच्याच हस्ते ही काकड आरती करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com