Paduka darshan Utsav 2024: ॐकाराची जादू : सुख, आरोग्याचा सोपा मार्ग, जाणून घ्या ॐकार जपाची महती

‘सकाळ’तर्फे ‘श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम’अंतर्गत २६ व २७ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ ते ६.४० या दरम्यान वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुनील तांबे यांच्या ॐकार जपाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने सुनील तांबे यांनी सांगितलेली ॐकाराची महती...
Sunil Tambe
Sunil TambeSakal

‘सकाळ’तर्फे ‘श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम’अंतर्गत २६ व २७ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ ते ६.४० या दरम्यान वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुनील तांबे यांच्या ॐकार जपाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने सुनील तांबे यांनी सांगितलेली ॐकाराची महती...

माझे बाबा पद्मश्री श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे, तसेच आजोबा वासुदेवशास्त्री तांबे यांच्यासारख्या आध्यात्मिक वारसा लाभलेल्या घरात माझा जन्म झाला. सहाजिकच अगदी लहान असल्यापासूनच ॐकार माझ्या कानावर पडत असे.

Sunil Tambe
Paduka darshan sohala 2024: संत, श्रीगुरू यांच्या पादुकांविषयी जाणून घ्या

मला लहानपणातील एक घटना आठवते. मी त्या वेळी साधारण तीन-साडेतीन वर्षांचा असताना शाळा सुटल्यावर अचानक पाऊस पडू लागला. मला घ्यायला आई शाळेत पोहोचली नव्हती. सर्व मुलांना कोणी ना कोणी घरी घेऊन गेले होते. शिक्षिका चिंतेत पडल्या. त्यांना वाटले मी आता बहुतेक भोकाड पसरणार. मी म्हटले, ‘आपण ॐकार म्हणू या.’ मी जमिनीवर बसून मांडी घातली व शांतपणे ॐकार म्हणायला सुरुवात केली. ॐकार गायनाने शारीरिक, मानसिक नि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते.

ॐकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः।

कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नमः ॥

भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितले आहे, ‘अक्षराणां अकारोऽस्मि’. मीच ‘अ’कार आहे. ‘अ’ कसा उच्चारायचा हे शिकवावे लागत नाही, ते साहजिकच असते. ‘अ’ हा परमतत्त्वाचा आविष्कार असलेला हा मूळ स्वर. त्याचाच होतो ॐकार. असा हा ॐकार तिन्ही स्तरांवर परिणामकारक आहे.

Sunil Tambe
Paduka Darshan Sohala 2024 : आनंदी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे ‘श्री फॅमिली गाईड’

ॐकाराचे उच्चारण

ॐकार लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी म्हणावा. याला जात-पात, वय, स्त्री-पुरुष, धर्म, वेळ कसलेही बंधन नाही. सकाळी उठल्यावर, शौच-मुखमार्जन, हात-पाय-तोंड धुऊन ॐकार म्हणणे उत्तम. या वेळी मनात अन्य विचारांची गर्दी नसते,

त्यामुळे ही वेळ सर्वांत उत्तम; अन्यथा कोणत्याही वेळी ॐकार म्हणता येतो. याच संकल्पनेवर आधारित ‘संतुलन ॐ मेडिटेशन (सोम)’ ही ॐकार उपासना श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी सुचवलेली असून, याचे जगभरातील अनेकांना उत्तम परिणाम मिळालेले आहेत. श्रीमद्‍भगवद्‍गीतेत भगवान श्रीकृष्णांनी याच साधनेचा उपदेश केलेला आढळतो (ॐ इति एकाक्षरं ब्रह्म व्याहरन्‌ ...अ. ८ श्‍लोक १२ व १३).

संतुलन ॐ मेडिटेशन (सोम) ही साधना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आजही आत्मसंतुलन येथील ॐकार मंदिरात सकाळ-संध्याकाळ उपासना सुरू आहे, तसेच विशेष प्रसंगी ‘झूम’द्वारे जगभरातील अनेक उपासक साधनेत सहभागी होतात.

भारतातच नव्हे, तर सर्व जगामध्ये सध्या उद्‍भवलेली परिस्थिती भयावह आहे. यासाठी आपली जीवनपद्धती बदलणे आवश्यक आहे. संपूर्ण जगाची जी अवस्था झाली आहे, त्यात सुधारणा करायची असल्यास एक गोष्ट निश्चित आहे की,

मनुष्याला स्वतःचे वागणे बदलावेच लागेल आणि जीवनात पुन्हा एकदा ‘मानवता’ आणावी लागेल. यासाठी यावर चिंतन करून बाबांनी ‘‌संतुलन जीवनाचे, एक संकल्प - सत्यदर्शनाकडे वाटचाल’ (लाईफ इन् बॅलन्स मूव्हमेंट - टोवर्डस् ट्रू परसेप्शन) हा प्रकल्प हाती घेतला होता. हा प्रकल्प पुढे नेण्यासाठीही आम्ही कार्यरत आहोत.

ध्वनीचे सामर्थ्य

ध्वनीचे सामर्थ्य मोठे आहे. सात स्वर, वेगवेगळे ताल, वेगवेगळ्या वाद्यांचा वेगवेगळा मनोभाव हे सर्व लक्षात ठेवून एक शास्त्र भारतीयांनी तयार केले. मंत्रांचे सामर्थ्य असते, तसेच संगीताचेही सामर्थ्य असते, आवश्यकता असते ती एकमेकांना जोडण्याची.

मंत्रांचे पाठांतर करत असताना त्यांचे रटण केले जाते, परंतु त्यात संगीत नसते, त्यात भाव आणता येत नाही. दुसऱ्या बाजूने संगीतालाच महत्त्व दिले तर मंत्रांची शुद्धता राहत नाही. मंत्र व संगीत या दोघांचा समन्वय केला तर काय होऊ शकते, कोठले रोग कसे बरे होऊ शकतात यावर बाबांनी प्रयोग केले, संशोधन केले व यातून ‌‘स्वास्थ्यसंगीत’ जन्माला आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com