Paduka Darshan Sohala : सुख अनुपम संतांचे चरणी..! नामस्मरणात न्हाले भाविक; पादुका दर्शनाने कृतकृत्य

श्रीगुरू पादुका दर्शनानिमित्त कार्यक्रमस्थळी भाविकांच्या सोयीसाठी अनेक सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
Paduka Darshan Sohala

Paduka Darshan Sohala

sakal

Updated on

मुंबई - पुष्परथामध्ये विराजमान संत आणि श्रीगुरूंच्या पादुकांची ढोलपथक आणि टाळ-मृदंगाच्या निनादात निघालेली मिरवणूक, चिन्मय मिशनचे आंतरराष्ट्रीय प्रमुख स्वामी स्वरूपानंद, आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी संत, सद्‍गुरू, महात्म्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याबाबत केलेले प्रतिपादन, दर्शन मंडपातील २१ संत आणि सद्‍गुरूंच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये असलेला भक्तिमय उत्साह, वेगवेगळी भजनी मंडळे व गायकांनी आळवलेले संतांचे अभंग, बालवारकऱ्यांच्या पखवाज व टाळांच्या ठेक्यातील हरिनामस्मरण, सायंकाळच्या सत्रात स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी सादर केलेली अभंग सेवा आणि संतुलन आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे यांनी सादर केलेल्या ‘ओंकार साधने’ने एका वेगळ्या आध्यात्मिक विश्वाची अनुभूती सर्वांना आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com