योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Artist Protest : राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांअंतर्गत पात्र असूनही कर्ज मिळत नसल्यानं चित्रकारानं अनोख्या आंदोलनाचा इशारा दिलाय. बँकांकडून कर्ज देण्यास सतत नकार मिळत आहे. अडवणूक केली जात असल्याचा आरोप चित्रकाराने केलाय.
Eligible But Loan Denied Artist to Hold Half Naked Painting Protest in Front of Mantralaya

Eligible But Loan Denied Artist to Hold Half Naked Painting Protest in Front of Mantralaya

Esakal

Updated on

राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांसाठी पात्र असूनही कर्ज मिळत नसल्यानं व्यथित झालेले चित्रकार प्रेम माने हे मुंबईत मंत्रालयासमोर आजपासून आंदोलन करणार आहेत. आगळंवेगळं असं आंदोलन करत ते निषेध नोंदवणार आहेत. प्रेम माने यांनी म्हटलं की, आत्मनिर्भर भारत योजना, अपंग बिज भांडवल योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना या शासनाच्या विविध योजनांसाठी मी पात्र आहे. यासाठी बरीच वर्ष पाठपुरावा केला तरीही मला कर्ज मिळत नाहीय. मुंबईत मंत्रालयासमोर पंतप्रधान मोदी यांच्या चित्रासहित अर्ध नग्न लक्षवेधी चित्र आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com