पालघरमध्ये भाजपचा उमेदवार कोण? डोकेदुखी कायम! 

भगवान खैरनार
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मोखाडा : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे दिवंगत खासदार ऍड. चिंतामण वनगा यांचा उत्तराधिकारी कोण, याबद्दल भाजपमध्ये संभ्रम कायम आहे. वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा आणि आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत. वनगा यांच्या निधनामुळे सहानुभूतीच्या लाटेची भाजपला आशा आहे; पण जिल्हा भाजपमध्ये दोन भिन्न मतप्रवाह असल्याने उमेदवार निश्‍चितीची डोकेदुखी वाढली आहे. 

ऍड. वनगा यांचे 30 जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे पालघर लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ही घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. वनगा यांचा उत्तराधिकारी म्हणून श्रीनिवास यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह वनगा समर्थकांनी धरला आहे. त्यासाठी वनगा समर्थकांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी श्रीनिवास यांची भेटही घडवून आणली. त्यानंतर श्रीनिवास यांनी उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली आहे. 

ऍड. चिंतामण वनगा आणि विष्णू सावरा यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. वगना यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला सहानुभूती मिळविण्यसाठी भाजपमध्ये खल निर्माण झाला होता. असे असले, तरीही एक मे रोजी भाजपच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल, असे सांगितले जात आहे. 

जिल्ह्यात रसातळाला गेलेल्या काँग्रेसने या पोटनिवडणुकीतून पुन्हा उभारी घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पक्षाचे नेते भाई जगताप यांच्या उपस्थितीत 11 उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रियाही पार पडली आहे. यात प्रामुख्याने माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, शंकर नम, माजी खासदार दामू शिंगडा यांचे पुत्र इच्छुक आहेत. पक्षाने प्रत्येक बुथनिहाय बैठका घेत दोन दिवसांत उमेदवार निश्‍चित करण्याचे ठरविले आहे. तसेच, कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन विकास आघाडीला सोबत घेऊन काँग्रेसने भाजपविरोधी मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

दरम्यान, या पोटनिवडणुकीबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत. पण स्थानिक पातळीवर शिवसेनेने पोटनिवडणूक लढविण्याची पूर्ण ताकदीने तयारी केली आहे. ठाकरे यांच्या आदेशानंतर पुढील रणनिती आखली जाणार आहे. दरम्यान, पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने सहानुभूती दाखवित शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा केला नव्हता. आता या निवडणुकीमध्येही भाजपने शिवसेनेकडून अशीच अपेक्षा ठेवली आहे. 

Web Title: Palghar BJP in dilemma over candidate for bypolls