Palghar: पालघरमध्ये फटाका कंपनीत स्फोट, ७ जण होरपळले; एकाचा मृत्यू, मालक फरार

Palghar Blast At Firecracker Company: पालघरमध्ये फटाका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
Palghar Explosion Case

Palghar Explosion Case

ESakal

Updated on

वाडा (पालघर) : तालुक्यातील कोनसई ग्रामपंचायत हद्दीतील फटाका बनवणा-या कंपनीत आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला असून सहा कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा स्फोटाने तालुका हादरला आहे.स्फोटाने भितीने मालक व्यवस्थापक पसार झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com