

BJP Faces Huge Backlash Over Palghar Accuseds Induction
Esakal
पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून भाजपनं दोन वर्षांपूर्वी काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच काशिनाथ चौधरींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये घेतलं. मात्र पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून पुन्हा चर्चा रंगताच भाजपनं युटर्न घेत प्रवेशाला स्थगिती दिली. प्रवेशाला स्थगिती दिल्यानंतर काशिनाथ चौधरींनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले.