
minor girl Marriage
ESakal
वाडा : वाडा तालुक्यात आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलींचे जबरदस्तीने विवाह आणि ५० हजार ते १.२५ लाख रुपयांत मुलींची आर्थिक देवाणघेवाण करण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता. २) पतीसह सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.