वसईत अडीच हजार लिटर भेसळयुक्त ताडीचा साठा जप्त; दोन आरोपींना अटक | Palghar crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Culprit arrested

वसईत अडीच हजार लिटर भेसळयुक्त ताडीचा साठा जप्त; दोन आरोपींना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मनोर : पालघर उत्पादन शुल्क विभागाच्या (palghar excise department) भरारी पथकाने कारवाई करत अडीच हजार लिटर भेसळयुक्त ताडीचा साठा (toddy stock seized) सोमवारी रात्री (ता. १५) जप्त केला. वसईच्या (vasai) वालीवमधील भोईदापाडा भागात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल (police FIR) झाला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख

भेसळयुक्त ताडीची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने वसई पूर्वेकडील वालीव भोईदापाडा नाक्यावर सापळा रचला होता. यावेळी एका टेम्पोला (एमएच ४८ बीएम ७२०१) कर्मचाऱ्यांनी थांबवून मालाची तपासणी केली असता ३५ लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या ७२ ड्रममध्ये भेसळयुक्त ताडी भरलेली आढळून आली. या ताडीमध्ये क्लोरोहायड्रेट या विषारी पदार्थांचा वापर केल्याचा संशय उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाला तात्काळ अटक करण्यात आली होती. कारवाई पथकात दुय्यम निरीक्षक उदय शिंदे, पांडुरंग पडवळ, संदीप पवार, बी. बी. कराड, अनिल पाटील, प्रशांत निकुंभ यांनी सहभाग घेतला होता.

मुख्य आरोपी हजर

तपासादरम्यान टेम्पो चालकाने भेसळयुक्त ताडीचा साठा विजय भोईर यांच्या मालकीचा असल्याची माहिती दिली. भेसळयुक्त ताडी वाहतूक आणि विक्रीच्या गुन्ह्यात विजय भोईर याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने त्याला फरारी घोषित करून शोध सुरू केला होता. मंगळवारी (ता. १६) सकाळी भोईर उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर येथील कार्यालयात हजर झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

loading image
go to top