पालघर जिल्हयाचा मुंबई विभागात चौथा क्रमांक

प्रमोद पाटील
शनिवार, 9 जून 2018

सफाळे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गेल्या मार्च महिन्यात  घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीने निकाल शुक्रवारी (ता.8)जाहीर करण्यात आला. या परीक्षेला पालघर जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला सुमारे  52,583 नियमित विद्यार्थी बसले होते.त्या पैकी 47,182 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्हयाचा शेकडा निकाल 89.73 टक्के लागला आहे. मुंबई विभागात पालघर जिल्हयाचा चौथा क्रमांक आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर इयत्ता दहावी च्या ऑनलाईन निकालाच्या वेगवेगळ्या माध्यमातून पोस्ट येत होत्या. त्यामुळे विद्यार्थी,पालक आणि शिक्षक हे गोंधळात पडत होते. आज बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केल्याने या गोष्टींना पूर्ण विराम मिळाला. पालघर जिल्हयात दहावीसाठी 98 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. जिल्हयातील सर्वाधिक केंद्र वसई तालुक्यात होती. वसई तालुक्यात दहावीची 48 केंद्र होती. 29,672 विद्यार्थी या केंद्रांवर परीक्षेला बसले होते. वसई तालुक्याचा 93.42 टक्के निकाल लागला असून जिल्हयात वसई तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला आहे  तर सर्वात कमी निकाल तलासरी तालुक्याचा लागला असून या तालुक्यातून शेकडा 78.65%  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पालघर जिल्हयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे  प्रमाण जास्त असून जिल्हयातून 22112 मुली उत्तीर्ण झाल्या असून त्यांचा शेकडा निकाल 90.63% आहे. तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांचे प्रमाण शेकडा 88.95  टक्के आहे. तर या परीक्षेला पुनः परीक्षेचा शेकडा निकाल 48.80 टक्के लागला आहे. 

 जिल्हयातील बहुसंख्य इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच काही अनुदानित माध्यमिक शाळांचे निकाल सुद्धा 100टक्के लागला आहे. या मध्ये लालोंडे येथील विद्या विनोद अधिकारी विदयालय, तलासरी येथील कस्तूरबा गांधी विदयालय  या मराठी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. 

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील, पालघर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्यासह विविध स्तरावर अभिनंदन होत आहे. 

जिल्ह्य़ातील तालुक्या नुसार शेकडा उत्तीर्ण विद्यार्थी  पुढील प्रमाणे-
तालुका - उत्तीर्ण
वाडा - 83.49%
मोखाडा - 90.86% 
विक्रमगड - 81.15% 
जव्हार -  89.04
तलासरी - 78.65%
डहाणू - 85.11%      
पालघर -  90.65%
वसई - 93.42%  
--------------
एकूण - 89.73%

Web Title: Palghar district's fourth division in Mumbai division